Public Transport : वाहतुकीची कोंडी सोडवा, बसेस वाढवा...अन्यथा सणासुदीच्या दिवसात होईल प्रवाशांची गैरसोय

Public Transport : प्रवाशांची संख्या वाढत असताना बसची उपलब्धता कमी असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसगाड्या वाढवण्याची मागणी केली आहे.
Public Transport nagpur
Public Transport nagpursakal
Updated on

सावनेर : येथील आगारात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार एसटी बसची संख्या कमी असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकावर दीड ते दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

पुढे सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांच्या समस्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रवाशांची समस्या सोडविण्यासाठी बसगाड्यांची संख्या वाढवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी तालुका भाजपचे महामंत्री तुषार उमाठे यांच्या नेतृत्वात नुकतीच आगार व्यवस्थापक तागडे यांना निवेदनातून करण्यात आली.

निवेदनकर्त्यांमध्ये भाजपचे तालुका महामंत्री तुषार उमाटे, समर्पण फाउंडेशनचे अभिषेक सिंह गहरवार, नरेंद्र ठाकूर, प्रणय तिबोले आदींसह प्रवाशांचा सहभाग होता. निवेदनात एसटीचा प्रवास सुरक्षित व प्रवाशांच्या सोयीचा समजला जातो. त्यामुळे नेहमीच प्रवासी एसटीची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.

सावनेर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज शेकडो ग्रामस्थ, शेतकरी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी एसटीने प्रवास करतात. यातच राज्य शासनाने एसटीच्या प्रवासात महिलांना ‘हाफ’ तिकीटची सवलत दिल्याने प्रवासी संख्येत वाढ होऊन एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली. यामुळे एसटी महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत.

परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या सावनेर येथील सुसज्ज आगारात एसटीचा तुटवडा असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगारातील एसटीची वाढती गरज लक्षात घेऊन व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी निदान साध्या बसेस तरी तातडीने आगारात पाठविण्यात याव्यात, अशी मागणी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठविलेल्या पत्राद्वारे करण्यात आली.

बसेसचा तुटवडा असल्यामुळे सावनेर आगारातून सुटणारी बस नेहमीच प्रवाशांनी भरगच्च भरलेली असते. प्लॅटफॉर्मवर बस लागली की आधीच बसची वाट बघत असलेले प्रवाशी जागा मिळविण्यास बसमध्ये चढतांना गर्दी करतात. यामुळे वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो.

— सतिश श्रीवास्तव, सावनेर

‘एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाने सावनेर आगारातील वाढती प्रवासीसंख्या बघून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार बसगाड्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून बसफेऱ्या वाढल्याने शाळा, कॉलेज व इतर प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच प्रवाशांना सोयीचे होऊन दिलासा मिळेल, यासाठी नुकतेच निवेदन सादर केले आहे.

— तुषार उमाठे, भाजप महामंत्री, सावनेर तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.