नागपूर : कोरोना काळात आरोग्यसेवेतील उणिवा पुढे आल्या. यानंतर अनेक आजारांबाबत सर्वेक्षण सुरू झाले. अलीकडे कफ, सर्दी, गळ्याला सूज, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या तीव्र श्वसनविकाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे.
रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना वायू प्रदूषणामुळे दाखल व्हावे लागते. सिमेंट रस्त्यांवरून वाहने धावताना टायर आणि सिमेंटच्या रस्त्यांमध्ये होणाऱ्या घर्षणातून कणयुक्त प्रदूषके निर्माण होतात. सिमेंट बांधकामातील धुळीचे कण वातावरणात उडतात. यातून श्वसनविकार वाढत असल्याचे निरीक्षण श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी नोंदविले.
ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ यादरम्यान शहरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) १४०-२१० च्या दरम्यान होती. शहरातील प्रदूषण वाढलेले होते. रुग्णांच्या केसपेपरवरील अभ्यासातून रस्त्यावरील धूळ, बांधकाम यामुळे निर्माण होणारी धूळ,
वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत आहे. वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये शहराजवळील पॉवर प्लॅन्ट, कोळसा खाण, मॅनिफॅक्चररिंग युनिट अशा कंपनीतून निघणारे सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कणयुक्त प्रदूषके श्वसनविकाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.
ओझोनची निर्मिती
गाड्यांमधून निघणाऱ्या प्रदूषणात कार्बनचे कण, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड जमिनीवरील वातावरणात मिसळतो आणि ओझोनची निर्मिती होते. सिमेंटचा रस्ता आणि टायर यांच्या घर्षणामुळे ध्वनिप्रदूषणसुद्धा होते.
कणयुक्त प्रदूषण आणि डिझेलच्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सल्फरडाय ऑक्साईड यांचा उत्सर्जनामुळे रुग्णांना दाखल व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना पूर्वीपासून श्वसनविकार आहेत, त्यांच्यावर अधिक प्रभाव पडला आहे, असे डॉ. अरबट म्हणाले.
प्रदूषणामुळे दिसणारी लक्षणे
कफ वाढणे
शिंक येणे
श्वास घेण्यास त्रास
ब्रॉन्कायटिस
अस्थमा-सीएओपीडीसारख्या
विकाराला ट्रिगर मिळणे
गळ्यात व नाकात त्रास
त्वचेचे विकार
डोळ्यांचे विकार
नागरिकांना रस्त्यावरील प्रदूषणामुळे श्वसनविकारास सामोरे जावे लागत आहे. यात वायुप्रदूषणाचा मोठा वाटा आहे. अशावेळी रस्त्यावर निघताना काळजी घ्यावी. शक्यतोवर मास्क घालावा. प्रदूषणमुक्त वातावरणात बाहेर जाणे टाळावे, जेणेकरून अस्थमाचा अटॅक व श्वसनविकारापासून दूर राहाता येईल.
-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ-क्रिम्स हॉस्पिटल, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.