अहो, आश्‍चर्ययम ! रस्त्यांची ‘एक्सपायरी डेट’ केवळ सहा महिन्यांचीच?

टेकाडीः सहा महिन्यांतच उखळलेला रस्ता.
टेकाडीः सहा महिन्यांतच उखळलेला रस्ता.
Updated on

टेकाडी(जि.नागपूर) : राष्ट्रीय महामार्गासोबत जोडलेल्या गावाच्या मुख्य रस्त्याची चाळण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या पाचशे मीटर बांधकामाचे कंत्राट डिसेंबर २०१८ मध्ये देऊन कार्यारंभ आदेश कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. तब्बल दोन ते तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामार्गापासून टेकाडी कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, मात्र सहा महिन्यातच  रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाल्याने रस्त्याच्या बांधकामावर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.

अधिक वाचाः संजय दत्तला झालेला कॅन्सर आहे तरी कोणता? कोणत्या व्यक्तींना आहे या कॅन्सरचा धोका? वाचा महत्वाची माहिती

प्रस्तावित किंमत साठ लाख
राष्ट्रीय महामार्गापासून टेकाडी वसाहतीत जाणारा हाच रस्ता पुढे गोंडेगाव, जुनीकामठी, घाटरोहना या गावांचा जोडरस्ता असल्याने नेहमीच वर्दळीचे प्रमाण जास्त असते. खड्ड्य़ांचा त्रासदायक अनुभव वाहनधारकांना अनेक वर्षापासून सोसावा लागतो. दिवसागणिक वाढणारी वाहतुकींच्या संख्येसोबतच खड्ड्य़ांची संख्याही वाढत होती. अशात जिल्हा परिषद निवडणुका संपताच गेल्या सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे पक्के डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाल्याने रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सोबत टेकाडी कॉलनी ते गावापर्यंत उर्वरित रस्त्याच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत जिल्हा वार्षिक योजना ३५५४ अंतर्गत रस्ता बांधकाम प्रस्तावित किंमत साठ लाख निधीतून रस्त्याच्या बांधकामाला जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडून जि.प. अध्यक्षांनी मान्यता प्राप्त करून घेतलेली होती. अद्यापही उर्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नसल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. अशात खड्यांमुळे एखाद्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

मदनापूरला जाणाऱ्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?
पचखेडी : कुही तालुक्यातील मदनापूर या गावाला नागपूर-आंभोरा मार्गावर जोडणाऱ्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करत नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यात खड्डे की खड्ड्य़ात रस्ता, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.मदनापूर हे गाव पचखेडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असून मदनापूर गावातून नागपूर-आंभोरा मार्गावर जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे सामान्य नागरिकाला अपघाताच्या भीतीची आशंका वाटत आहे. खूप वर्षाआधी ग्रामपंचायतीने या रस्ताचे बांधकाम केले असून तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्तीही झाली नाही व कोणी बघायला पण आले नाही. या  रस्त्यावरुन मदनापूर येथील नागरिक दैनंदिन अवागमण करीत असून कित्येकदा अपघातसुध्दा झालेले आहेत. मदनापूर येथील विद्यार्थी वेलतूर व मांढळ पचखेडीला शिक्षण घेण्यासाठी येत असताना याच बसथांब्यावर येऊन थांबावे लागते.

सगळं काही सुरळीत होताच कामाला सुरुवात करू
रखडलेल्या रस्त्यासाठी ६० लाख इतका निधी मंजूर झाला आहे. सध्या कोरोनाकाळात निधी ‘रिजर्व’ करायचा आहे. अशात निधी नसल्यामुळे कामाचे टेंडर टाकणे शक्य नाही. म्हणून रस्त्याचे काम थांबलेले आहे. लवकरच सगळं काही सामान्य होताच कामाला सुरुवात करू. नवीन डांबरीकरण रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही करू.
रश्मी बर्वे
जिल्हा परिषद अध्यक्ष

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.