Israel-Hamas War: भारतात 'या' मुद्द्यांवर कधीही युद्ध झालं नाही, कारण आम्ही 'हिंदू'; मोहन भागवतांचे विधान

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

Israel-Hamas War: इस्राइल आणि हमास यांच्यात दोन आठवड्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. युद्धात दोन्ही बाजूंचे सुमारे 5500 लोक मरण पावले आहेत. दरम्यान, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी या युद्धावर भाष्य केले. हिंदू धर्म सर्व पंथांचा आदर करतो. इस्त्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असताना भारतात अशा मुद्द्यावर कधीही युद्ध पाहिले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत शनिवारी नागपुरातील एका शाळेत आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.

"देशाला एक धर्म आणि संस्कृती आहे, जो सर्व पंथ आणि श्रद्धांचा आदर करतो फक्त हिंदू धर्म आहे. हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आपण इतर धर्म नाकारतो असा नाही. जर तुम्ही हिंदू बोलत असाल तर आम्ही मुस्लिमांनाही संरक्षण दिले हे सांगायची गरज नाही. सर्व धर्माचे रक्षण फक्त हिंदूच करतात. भारत हा एकमेव देश आहे जिथे प्रत्येक धर्म स्वीकारला जातो. इतरांनी तसे केले नाही", असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले, "जगभर संघर्ष सुरू आहे. तुम्ही युक्रेन-रशिया किंवा हमास-इस्राइल बघा. पण या मुद्द्यांवरून आपल्या देशात कधीही युद्धे झाली नाहीत. शिवाजी महाराजांच्या काळात असे हल्ले झाले, पण आम्ही कधी लढलो नाही. या मुद्द्यावर कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणूनच आपण हिंदू आहोत."

Israel-Hamas War
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कट्टर शिवसैनिकाने सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

इस्राइल-हमास युद्धाचे कारणे काय?

हमासने 7ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला होता. गाझा पट्टीतून 20 मिनिटांत इस्राइलवर सुमारे 5 हजार रॉकेट डागण्यात आले होते. याशिवाय हमासच्या सैनिकांनी सीमेला लागून असलेल्या भागात घुसून सुमारे 200 लोकांना ओलीस ठेवले. हमासच्या या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 306 जवानांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

इस्राइलने जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या अपवित्र कृत्याचा हा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने म्हटले आहे की इस्राइली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून अपवित्र केले होते. इस्राइलचे सैन्य हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले करत आहे आणि अतिक्रमण करत आहे. इस्राइली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे. हमासचे प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्राइलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे.

Israel-Hamas War
ShivSena: शिवसेना पक्ष, चिन्ह ठाकरेंना परत मिळणार का?, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिवाळीनंतर सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()