RTO Firing Case: कलेक्शनच्या बैठकीला मोठ्या अधिकाऱ्यांची हजेरी, CCTV फुटेज आलं समोर; गुन्हे शाखा करणार चौकशी

मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात शंकरनगर चौकातील एका पॉश रेस्टॉरंटमधून सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले.
RTO Firing Case: कलेक्शनच्या बैठकीला मोठ्या अधिकाऱ्यांची हजेरी, CCTV फुटेज आलं समोर; गुन्हे शाखा करणार चौकशी
Updated on

Nagpur RTO Officer Firing Case: मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात शंकरनगर चौकातील एका पॉश रेस्टॉरंटमधून सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले.

या फुटेजमध्ये हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ‘कलेक्शन’च्या बैठकीत चार मोटार वाहन निरीक्षकासह आरटीओचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून होणार असल्याचे समजते.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मोटार वाहन निरीक्षक नियमितपणे रेस्टॉरंटमध्ये जवळपास तास बसलेले आढळले. आता या मोटार वाहन निरीक्षकांची लवकरच गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, संकेत गायकवाड यांची पत्नी आणि पीडब्ल्यूडी अधिकारी कोमल गायकवाड बुधवारी गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या. त्यांची चौकशी करीत, साक्ष नोंदविण्यात आली. आता आरटीओ गोळीबार प्रकरणाच्या तपासात गोळीबार प्रकरणात वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्याची भूमिका उघड झाली असून गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

RTO Firing Case: कलेक्शनच्या बैठकीला मोठ्या अधिकाऱ्यांची हजेरी, CCTV फुटेज आलं समोर; गुन्हे शाखा करणार चौकशी
Pune Breaking: पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल, शोधकार्य सुरू

गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेला निधी हेच प्रमुख कारण असल्याचे तपासात समोर आले होते. मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड, पूर्वी गीता शेजवळ यांच्या देखरेखीखाली आरटीओमध्ये येथे भरारी पथकाचे प्रमुख होते. गायकवाड एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार, निधी संकलनात गुंतले होते. ज्यामुळे शेजवळ आणि गायकवाड यांच्यात वाद झाला.(Latest Marathi News)

RTO Firing Case: कलेक्शनच्या बैठकीला मोठ्या अधिकाऱ्यांची हजेरी, CCTV फुटेज आलं समोर; गुन्हे शाखा करणार चौकशी
Nashik Crime: माजी आमदार जे. पी. गावित यांना दंडाची शिक्षा; बँक मॅनेजरला केली होती मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.