नागपूर : शहरातील वाहतुकीत गेल्या काही वर्षांमध्ये चारचाकी वाहनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यापैकी बऱ्याच कारचालकांमध्ये वाहन चालविताना शिस्त नसल्याचे दिसून येते. त्यातूनच वाहतूक विभागाद्वारे गेल्या वर्षभरात महिन्यात ३८ हजार ९९३ चारचाकी वाहनचालकांवर सीटबेल्टअंतर्गत कारवाई करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यातून सातत्याने अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येते. गेल्या दहा महिन्यात ७८५ अपघातात २३२ जणांचा मृत्यू तर ८५८ नागरिक जखमी झाले. यामध्ये बहुतांश दुचाकीस्वार असले तरी कार आणि ट्रकच्या धडकेमुळेच हे अपघात झाल्याचे दिसून येते.
दुसरीकडे शहरातील लगतच्या महामार्गावरही चारचाकीच्या अपघातात वाढ होताना दिसते. ही बाब वाहतूक विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे कुठलेही चारचाकी वाहन सीटबेल्ट लावल्याशिवाय चालवायचे नाही, असा नियम आहे. त्यामुळे अपघातादरम्यान जखमी होण्याचा धोकाही टळतो. मात्र, वाहनचालकाकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते. शहरातही चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांशी चारचाकी चालक वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करीत नसल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १ जानेवारी ते डिसेंबरदरम्यान ४१ हजारांवर वाहनचालकांवर सीटबेल्टची कारवाई करण्यात आली. ऑक्टोबर २०२१ ते २०२२ दरम्यान विचार केल्यास ३८ हजार ९९४ चारचाकी वाहन चालकावर सीटबेल्टची कारवाई करण्यात आलेली आहे.
अशी आहे कारवाई
१ जानेवारी ते डिसेंबर २०२१ - ४१,००० (अंदाजित)
ऑक्टोबर २०२१ ते २०२२ - ३८,९९४
१ जानेवारी ते सप्टेंबर २०२२ - ३७,१७३
वाहनचालकांना शिस्त कशी लागेल ?
शहरात सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३७ हजार १७३ चारचाकी वाहन चालकांवर सीटबेल्टची कारवाई करण्यात आली. याशिवाय चारचाकी वाहनांवर ब्लॅक फिल्मअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील चारचाकी वाहनाचालकांना शिस्त कशी लागेल, हा प्रश्न निर्माण होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.