नागपूर : मजुरांची टंचाई आणि उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे केसरचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यंदा केसरचे भाव आकाशाला भिडले आहे. एक किलो केसरसाठी १ लाख ३५ हजार रुपये मोजावे लागत आहे. सोन्यापेक्षा महाग असलेले केसर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. केसर अन्नाची चव देखील वाढवते.
केसरचे उत्पादन कश्मीर आणि थंड हवेच्या परिसरात होते. यंदा काश्मीरमध्ये कामगारांच्या टंचाईचा फटका केशरच्या उत्पादनावर पडला आहे. तीन महिन्यांपूर्वी १ लाख २० हजार रुपये किलो असलेली केसर १ लाख ३५ हजर रुपये किलोवर गेली आहे. म्हणजे एक ग्रॅम केसरसाठी १३५ रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे मिठाईचा स्वाद बिघडला आहे.
तीन महिन्यांपूर्वी हाच भाव १२० रुपये ग्रॅम होता. केसरच्या लागवडीपासून बाजारात विक्री होईपर्यंत ही प्रक्रिया खूप कठीण आहे. केसर शेतात तयार होण्यापासून तर हवाबंद डब्ब्यात पॅक होईपर्यंत खूप मेहनत लागते. केसरची लागवड ऑगस्टमध्ये केली जाते आणि फूल येण्याची सुरुवात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. या फुलांच्या प्रक्रियेस फक्त एक महिना लागतो.
असे मानले जाते की ते १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान होते. त्याचवेळी केसरला पाणी हे नैसर्गिकरीत्या दिले जाते म्हणजे पावसाच्या पाण्यावर केसरची शेती केली जाते. त्यामुळे फुले काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि श्रम खर्च खूप जास्त असतो. काश्मीरच्या फक्त एका भागात केसरची जास्त लागवड केली जाते. कारण, तेथे विशेष लाल रंगाची माती आहे, ज्यामध्ये केशराची लागवड केली जाते असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.