नागपूर: सलाम एअर कंपनीच्या विमानाने बांगलादेशहून ओमानकडे प्रवास करत असताना एका प्रवाश्याची प्रकृती अचानक बिघडल्याने नागपुरात तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच प्रवाशी मोहम्मद खैर (वय ३३) यांची प्रकृती खालावली, ज्यामुळे वैमानिकांनी तातडीने नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधून वैद्यकीय मदतीसाठी लँडिंगची परवानगी घेतली.