Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर कारला अपघात;दोन गंभीर जखमी, कारली गावानजीकची घटना

श्री संत गजानन महाराज शेगाव येथून दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कारचा टायर फुटल्याने कारंजासमोर कारली गावानजीक लोकेशन १७५ वर अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले.
Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway Accident sakal
Updated on

कारंजा : श्री संत गजानन महाराज शेगाव येथून दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कारचा टायर फुटल्याने कारंजासमोर कारली गावानजीक लोकेशन १७५ वर अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार कार क्रमांक एम. एच. ३१एफ इ ९८२० ही समृद्धी महामार्गाने शेगाववरून नागपूरकडे जात असताना लोकेशन १७५ वर कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच लोकेशन १०८ समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण, डॉ. सोहेल खान व जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक नितीन पाटील मानकर व श्री गुरू मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले.

प्रथमोपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले. शरयू नागरे (वय २८) व मेघाताई नागरे (वय ४८) असे जखमींची नावे आहेत. अपघातस्थळी समृद्धी महामार्ग अग्निशामक दल, एच एस सी टीम, समृद्धी महामार्ग महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, हायवे पोलिस प्रामुख्याने हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.