खापरखेडा (जि. नागपूर) : मागील अनेक दिवसापासून बिना (संगम) येथे अवैध रेतीचे नियमबाह्य उत्खनन करून उचल करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रशासनाच्या ढिलाईमुळे रेती माफियावर फारसा कुठलाही वचक राहिला नसल्याने जणूकाही रेती माफियांना आता सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसून येत आहे.
विविध अवैध धंद्यापैकी अवैध धंद्याचा एक अंग म्हणजे उत्खनन मलाईचाच भाग आहे. खापरखेडा परिसरातील बिना (संगम) पर्यटन "क"तीर्थस्थळ असून बाजूला काही अंतरावर बिना(सं) गाव शिवारात ओपन कास्ट कोळसा खान सुरू आहे. सदर बिना संगम परिसरातील काही शेत्या वेकोली प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
मागील तीन-चार महिन्यांपूर्वी कन्हान, कोलार आणि पेंच या नद्यांच्या महापुरात अनेक शेती महापुराचा पाण्यात बुडाल्या होत्या. अशा शेतीमध्ये महापूराच्या पाण्याने रेतीचा थर जमा झाला होता. अधिग्रहित केलेल्या शेतातून रेती माफिया अवैध रेती चोरी करीत आहे. मात्र संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचं दिसत आहे. प्रशासनाला जाग कधी येणार ? असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो.
बिना( संगम) परिसरातील रेती चोरटे हे महिंद्रा,बोलोरो पिकप डाला मालवाहूचारचाकी गाडीने मध्यरात्रीपासून पहाटे सकाळपर्यंत उचल करीत असल्याचे नागरिक दबक्या आवाजात बोलत असतात. सदर उत्खननातील अवैध रेती काही सिमेंट विटा कंपनीत कमी भावात विकून साठाही करीत असल्याची चर्चा गावक-यात होत आहे.
या रेती चोरीने संबंधित प्रशासनाला लाखो रुपयांचा चूना लागून फटका बसत आहे.एवढेच नाही तर अवैध रेती वाहतुकीच्या गाड्यांनी मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली.परंतू अशा गंभीर विषयाकडे संबंधित प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. अशा रेती माफियांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले दिसून येते. विशेष म्हणजे बिना (संगम) गावात अनेक जण अवैध रेती व्यवसायातून ट्रक चालक-मालकही बनले असून आता मात्र बोलोरो,महिंद्रा पिकप च्या गाडीने रेती वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या व्यवसायातून अनेक जण लखपती झाले . संबंधित प्रशासनाला या विषयाची इंत्यंभूत माहिती असेलच अशा शंका-कुशंकेची ग्रामस्थात चर्चा होत असते.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.