भिवापूर (जि.नागपूर) : शहराला लागून वाहणाऱ्या मरू नदीसह तालुक्यातील अन्य नद्यांच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा करून तिची चोरटी वाहतूक करण्याचा गोरखधंदा मागील काही महिन्यांत येथे प्रचंड वाढला आहे. हा प्रकार निरंतर सुरू असून, यावर निर्बंध लादण्याऐवजी महसूल विभाग तोंडावर बोट ठेवून हाताची घडी करून बसला आहे. याबाबत येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : आता बोला...चक्क पोलिस कर्मचा-यालाच सायबर गुन्हेगाराने बनविले मामा
वाळूमाफियांचे असते वेळापत्रक
शहराला लागूनच मरू नदी वाहते. मागील काही महिन्यांपासून या नदीच्या पात्रातील वाळू चोरून नेण्याचा सपाटा येथील काही वाळूतस्करांनी सुरू केला आहे. ही वाळू बांधकामाकरिता वापरण्यात येत असल्याने तिची बऱ्यापैकी मागणी आहे. शिवाय या धंद्यातून चांगली कमाई होत असल्याने अनेक जण यात गुंतले आहेत. नदीपात्रातील वाळूचोरीसाठी चोरट्यांना सकाळ व सायंकाळची वेळ ही सोयीची ठरते. सकाळी नऊ ते सहापर्यंत तहसील कार्यालय सुरू असल्याने या काळात वाळूचोरी बंद असते. सुटीच्या दिवशी मात्र दिवसासुद्धा चोरीचा प्रकार सुरू असतो.
हेही वाचा : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याचे "लर्न फ्राम होम'
साठवणूक करून दुप्पट दरात विक्री
सध्या वैनगंगा नदीवरील रेतीघाट बंद असल्याने पवनीवरून वाळूचा होणारा पुरवठा थांबलेला आहे. अन्य पर्याय नसल्याने बांधकाम करणाऱ्यांकडून येथील वाळूचा वापर केला जात आहे. वीटभट्टीकरितासुद्धा येथील वाळू वापरली जात असल्याने चोरट्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ते चढ्या दरात रेती विकून रग्गड पैसा कमवीत मालामाल होत आहेत. मरू नदीसोबतच चिखली मार्ग, नक्षी मार्ग, गोंडबारी, सेलोटी या मार्गावर असलेल्या नदीमधूनही वाळूचा प्रचंड उपसा सुरू आहे. अनेक रेती भरलेले टॅंक्टर या भागातून धावताना दिसतात. शहराला लागून असलेल्या परसोडीवरून नक्षीला जाणारा मार्ग, चिखलीला जाणारा मार्ग, नक्षी व मोखाळा गावाला लागून असलेला नदीचा परिसर या भागात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. काही चोरटे आडमार्गाला वाळूची साठवणूक करून नंतर ती दुप्पट दरात विकत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : आनंदवार्ता, कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी तयार केले हे मॉडेल
चोरीसाठी होतो ट्रॅक्टरचा वापर
वाळूचोरीसाठी टॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही ठिकाणी जेसीबी लावून टॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. अनेक टॅक्टर मालक या चोरीच्या धंद्यात गुंतले असल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.