Pandharpur Wari 2024 : तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।।

धावा म्हणजे धावणे. असं म्हणतात संत श्री तुकाराम महाराज एकदा वारी करीत असताना त्यांना वेळापूर येथे छोट्याशा टेकडी वरून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला व कळस दिसता क्षणीच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत सुटले .
sant tukaram maharaj look at once velapur vitthal mandir pandharpur wari warkari
sant tukaram maharaj look at once velapur vitthal mandir pandharpur wari warkari Sakal
Updated on

- संदीप जिवलग कोहळे

धावा म्हणजे धावणे. असं म्हणतात संत श्री तुकाराम महाराज एकदा वारी करीत असताना त्यांना वेळापूर येथे छोट्याशा टेकडी वरून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला व कळस दिसता क्षणीच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत सुटले . त्याचे स्मरण म्हणून आजही माऊलींच्या व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखीचा धावा होतो.

शुकसनकादिकीं उभारिला बाहो ।

परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥

उठाउठी करी स्मरणाचा धांवा ।

धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥

त्वरा जाली गरुड टाकियेला मागें ।

द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥

तुका म्हणे करी बहु च तांतडी ।

प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

शुक-सनकादिक ऋषींनी आपले दोन्ही ही बाहू उभारून सांगितले की, परिक्षिति त्याच्या साधनेमुळे केवळ सात दिवसांत कृतांत झाला. तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा मग तुमच्या भेटीसाठी सुद्धा हरी धीर धरणार नाही.

द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण सुद्धा गरुडाची चाल मंद आहे हे जेव्हा श्रीकृष्णाला कळले तेव्हा द्रोपदीच्या सौरक्षणाकरिता श्रीकृष्ण स्वतः धावत आले. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे.

धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥

वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकुरा ॥ध्रु.॥

उशीर तो आतां । न करावा हेचि चिंता ॥२॥

तुका म्हणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥

माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेळापूर येथे धावा होतो. वेळापूर येथून पंढरपूर फक्त ४० किमी अंतरावर आहे. पंढरपूर जवळ आल्याच्या आनंदात येथील उतारावरून वारकरी धावत सुटतात. येथे उताराजवळ आल्यावर दिंड्यांमध्ये ‘सिंचन करता मूळ । वृक्ष ओलावे सकळ ।।’ हा अभंग होतो. या अभंगाचे शेवटचे चरण ‘तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।।’ म्हणून झाले की येथून दिंडी धावायला सुरवात करते. वृद्ध वारकरी सुद्धा कडे कडेने हळू हळू धावतात.

चोपदार टप्प्या टप्प्याने एकेक दिंडी सोडतात. त्यामुळे लोकांना व्यवस्थित धावता येते. माऊलीच्या पालखी सोहळ्यात आज माळशिरस ते वेळापूर या प्रवासात खुडुस फाटा येथे दुसरे गोल रिंगण व वेळापूर ते भंडीशेगाव या दरम्यान ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल तसेच माऊली व संत सोपान देवांच्या बंधू भेटीचा सोहळा सुद्धा तोंडले - बोन्डले ते भंडीशेगाव या दरम्यान होणार आहे.

त्यावेळेस दोन्ही रथ शेजारी येतात. दोन्ही रथातले मानकरी परस्परांना नारळ प्रसाद देतात. याच मार्गावर तुकोबांच्या व सोपानकाकांच्या पालखीची सुद्धा भेट होते. अलीकडील काळात मार्गात बदल झाल्याने हे तीनही सोहळे एकाच दिवशी एकाच रस्त्याने जातात. या व्यतिरिक्त अन्य काही संतांच्या पालख्यांची सुद्धा वाखरी येथे भेट होते.

तापीतीर ते भीमातीर श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून १८ जूनला प्रस्थान ठेवलेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा ६०० कि.मी.अंतर मजलदरमजल प्रवास करीत आज शेवटच्या मुक्कामी आष्टी ता.मोहोळ जि.सोलापूर येथपर्यंत पोहचला आहे तेथून श्रीक्षेत्र पंढरपूर ३० कि.मी. अंतरावर राहीले आहे.

त्यामुळे वारकऱ्यांत उत्साहाचे उधाण आले विठूरायाच्या दर्शनाची ओढ तीव्र लागली आहे. कालच्या माढा मुक्कामात शहरवासी व्यापारी मंडळींकडून पालखीचे अद्भुत स्वागत करण्यात आले होते,ठिकठिकाणी जेसीबी ने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. उद्या रोपळे येथील दुपारच्या विसाव्यानंतर संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरीत दाखल होणार आहे. २७ दिवसांची भेटीची ओढ तीव्र जाणवत असताना रोपळे येथील दुपारचा विसाव्यानंतर धावा बोलण्यात येतो.

धावत धावतच वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघतात. श्रीक्षेत्र पंढरपूरात प्रवेश करतेवेळी संत शिरोमणी नामदेव महाराज पादुका दिंडी सामोरे येते,संत नामदेव महाराज विद्यमान १७ वे वंशज ह.भ.प. विठ्ठल महाराज नामदास मुक्ताई पालखीचे पूजन करतात,नंतर चंद्रभागेच्या तीरी पालखी सोहळा पोहचतो, तेथे आई मुक्ताईंच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते, वारकरी भाविक चंद्रभागेत पहिले स्नान करून व चंद्रभागा आरती करतात,

नंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भूवैकुंठ पंढरपूर येथे मिरवणुकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विसावतो. आषाढी पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो. १६ जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपान, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.

- अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर

मो. ९८३३५९९२६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.