सांगा जहॉंपनाह ! जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करायचे कसे ?

कामठीः नायब तहसीलदारांना निवेदन देताना अंगणवाडीसेविका.
कामठीः नायब तहसीलदारांना निवेदन देताना अंगणवाडीसेविका.
Updated on

कामठी (जि.नागपूर) : बालक, स्तनदा, गर्भवतीला पोषण आहार पुरवायचा. कमी वजनाच्या मुलांचा शोध घ्यायचा. अंगणवाडी सेविकांना ठरवून दिलेली ही कामे सुरूच आहेत. त्यात पुन्हा 'माझे कुटुंब ,माझी जवाबदारी' मोहिमेत सर्वेक्षण करायला सांगितले. यापूर्वी कोरोनाचा तीनवेळा सर्वे केलाय. कोणतीही सरकारी योजना आली की बोलवा अंगणवाडी सेविकांना......नाही म्हटले की नोटीस देण्याची धमकी....., पगार वीतभर आणि काम हातभर, अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत, तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'माझे कुटुंब, माझी जवाबदारी' मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत कोरोना सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शविला आहे.

अधिक वाचा: डिसेंबर अखेरपर्यंत राहणार बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार लाॉकडाउनच...

योजनेत काम करणे शक्य नाही !
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ११ सप्टेंबरला  काढलेल्या  परिपत्रकानुसार १४ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत ४० दिवस 'माझे कुटुंब, माझी जवाबदारी' ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत अंगणवाडी कार्यकर्त्यांचा समावेश राहणार असून या अंगणवाडी  पथकाला  दररोज ५० घरांना भेटी देऊन ताप तपासणी, गरज पडल्यास इतर सुविधा देणे, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्री कोविड, कोविड व पोस्ट कोविड या संबंधी मार्गदर्शन करायचे आहे. दरम्यान एखादी अंगणवाडी कार्यकर्ता कोरोना बाधित आढळल्यास त्यांची जवाबदारी कोण घेणार, या विवंचनेत अंगणवाडी कार्यकर्ते हे भरभटले आहेत. एक सप्टेंबरपासून १० दिवस पोषण महिना म्हणून साजरा करायचा आहे. तेव्हा अशा परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जवाबदारी’ या योजनेत काम करणे शक्य होत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी या योजनेत काम करण्यास नकार दर्शविला. सोमवारी कामठी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार उके यांना 'आयटक' च्या वतीने सामूहिक  निवेदन  सादर केले.

यांनी दिले निवेदन
निवेदन सादर करताना विजया साखरे, नंदा पोगडे, कल्पना मेश्राम, अनुरेखा मानवटकर, शालू फुकट, मंदा उके, अर्चना लोहबरे, अलका आजवले, संगीता शेंडे, स्मूर्ती दहाट, आशा मरघडे, सत्यभामा मानकर, वनिता  ढोके, अरुणा तांडेकर, शोभा वानखेडे, संगीता करडभाजने, अंजना करडभाजने, सुनीता साळवे,  शांतकला वासनिक , ताराबाई पाटील , वच्छला इरपाते, कांता वासनिक, अर्चना सहारे, हर्षा पोटे, करुणा राऊत, कुंदा मेंढे, माला नांदूरकर, संगीता वाढेलकर, प्रभा वाळके, गीता वाईलकर, संध्या, मनीषा मानवटकर, पुष्पा सोनसरे, विमल चव्हाण, गीता गजभिये, सुनीता थोटे, तुळसाबाई ठाकरे ,प्रवीणा पाटील, जयश्री ठवरे, कल्पना अतकरी, रजनी पाटील, लता घुटके, सविता अतकर, शारदा मडकवाडे, भारती नगरकर आदी उपस्थित होते.

या आहेत त्रुटी
-अंगणवाडीसेविकांना या मोहिमेसंदर्भात कुठलेही प्रशिक्षण दिले नाही.
-सुरक्षात्मक दृष्टिकोनातून कुठलेच साहित्य पुरविले  गेले नाही.
-अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांची नियमित कामेसुद्धा करायचे आहेत.
-एक सप्टेंबरपासून १० दिवस पोषण महिना म्हणून साजरा करायचा आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.