Nagpur School News : आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; अडीच महिन्यानंतर वाजणार शाळांची घंटा, शिक्षकांनी केली शाळेची सजावट

School Reopening 2024 : विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे याकरिता रविवारीच शाळांमध्ये शिक्षकांनी शाळांमध्ये फुगे, पताका लावून वर्ग सजावट केली.
Nagpur School News
Nagpur School NewsSakal
Updated on

Nagpur News : जिल्हा परिषदेच्या शाळांसह राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा सोमवार (१ जुलै) पासून सुरू होत आहेत. त्यामुळे सुमारे अडीच महिन्यानंतर शाळांची घंटा वाजणार असून सोबत विद्यार्थ्यांना किलबिलाटही पुन्हा ऐकू येणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे याकरिता रविवारीच शाळांमध्ये शिक्षकांनी शाळांमध्ये फुगे, पताका लावून वर्ग सजावट केली. तसेच फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहिण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवात पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत पाठ्यपुस्तकेही वितरित होणार आहे. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीच्या सुट्यांनतर पुन्हा शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनीही शाळा सुरू होणार असल्याने तयारी केली आहे. मुलांची आवश्यक सर्व साहित्य खरेदी केली आहे. मुलांना पहिल्याच दिवशी आनंदी वातावरण मिळावे म्हणून शाळेची रंगरंगोटी, डागडुजी व व्यवस्था करण्यासाठी दोन दिवस देण्यात आले होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जि.प.च्या १५१२, महापालिकेच्या १३० वर शाळांतील व इतर अनुदानित शाळांतील इयत्ता १ ते ८ च्या १.६० लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. बहुतांश महापालिका व जि.प.च्या शाळांमध्ये समग्रमधून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शुज-सॉक्सचे वाटप होणार आहे.

पहिल्या दिवशी गणवेश अशक्यच

जिल्हा परिषद व महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत गणवेश देण्यात येतो. यंदा शासनस्तरावरूनच गणवेशाचा कापड उपलब्ध होणार असून, त्यापासून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या महिला विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून मिळणार आहे. परंतु आतापर्यंत गणवेशाचा कापडच जिल्ह्याला उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून तरी काही दिवस जुन्याच गणवेशावर शाळेत यावे लागेल. ज्यांच्याकडील जुने गणवेश खराब झाले असतील किंवा गणवेशच नाही, त्यांची मोठी अडचण होणार आहे. त्यांनी सामान्य ड्रेसमध्ये यावे लागेल.

रांगोळ्या काढून आणि पुष्पवर्षाव होणार

शाळेच्या द्वारावर रांगोळ्या काढून आणि पुष्पवर्षावाने पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्याच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शहर व ग्रामीण भागातील राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.