विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळेनं लढवली अनोखी शक्कल

विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळेनं लढवली अनोखी शक्कल
Updated on

नागपूर : कोरोनामुळे (Corona virus) पहिली ते बारावीपर्यंतच्या (1st to 12th exams) परीक्षा रद्द करण्यात आल्यात. अशा परिस्थितीत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना वरचा वर्गात ‘प्रमोट' करण्याचे आदेश सरकारने काढले. त्यामुळे नाईलाजाने जवळपास सर्वच शाळांनीही तीच भूमिका बजावली. मात्र, यापेक्षा वेगळी वाट धरीत काँग्रेसनगरातील न्यू इंग्लिश हायस्कूलचा (New English high school) पूर्व माध्यमिक विभागाने नेहमीच्या पाठांतरावर आधारित मूल्यांकनाला फाटा देत अभिनव उपक्रमांवरून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मूल्यांकन केल्याचे समोर आले आहे. (School in Nagpur initiate different assessment process for students)

विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळेनं लढवली अनोखी शक्कल
अंतराळातून नाही तर महासागरांमधून येताहेत एलियन्स?

परीक्षा म्हटली की, विद्यार्थी घोकंपट्टी करीत, पेपर देतात. नव्या शैक्षणिक धोरणात त्याला फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी ऑनलाइन वर्गात नेहमीच्या पाठांतरावर आधारित मूल्यांकनाला फाटा देत, काँग्रेसनगरातील न्यू इंग्लिश हायस्कूलचा पूर्व माध्यमिक विभागाद्वारे विविध उपक्रमांवर आधारित विषयनिहाय मूल्यांकन करण्यात आले.

यात पावर पॉइंट प्रेझेंटेशन ,कथाकथन, कोडी ,कविता-गाणी,प्रकल्प प्रस्तुतीकरण इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. याशिवाय आपली संस्कृती, सद्य परिस्थिती ,आपला उज्वल इतिहास या गोष्टींची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा या हेतूने काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले. या अभिनव प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत परीक्षा दिल्याचे जाणवलेही नाही.

गणित विषयाची तपासली क्षमता

शाळेकडून २६ ते ३१ मे यादरम्यान गणित विषयाअंतर्गत येणाऱ्या सर्व क्षमतांच्या विकासाचे मूल्यांकन घेण्यात आले. त्यात ५ ते ७ या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी १ ते २५ पर्यंत पाढे पाठांतर करणे, १ ते ५० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठांतर, विविध भूमीतिय आकारांची ओळख, भौमितिक सूत्रे, एक्सपान्शन फॉर्मुले, गणिताच्या काही मूलभूत संकल्पना या सर्व घटकांचा दैनंदिन व्यवहारात होणारा उपयोग यावर आधारित प्रश्नमंजूषा, मॅथक्राफ्ट, व प्रकल्प निर्मिती घेण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळेनं लढवली अनोखी शक्कल
ब्रेकिंग! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात? कोर्टानं जात प्रमाणपत्र केलं रद्द

याशिवाय घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून प्रकल्प निर्मिती केली. त्यात ६० विद्यार्थ्यांचे प्रकल्प तयार करण्यात आले. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १५ प्रकल्पाची निवड घेण्यात आली. त्याचे परीक्षण राजेंद्र चौधरी (वर्धा), आण्णाप्पा रावसाहेब परीट (कोल्हापूर) यांनी केले. त्यात इयत्ता पाचवी आणि सहावीतून राणी चव्हाण (प्रथम), पीयूष गायधने (द्वितीय), सम्यक वैरागडे, आर्या नेवारे (तृतीय) तर सातव्या वर्गातून निधी बोडे (प्रथम), अक्षदा ढेंगरे, अथर्व वैरागडे (द्वितीय) विजयी झाले.

(School in Nagpur initiate different assessment process for students)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()