SCERT Exam : परीक्षा केली सोपी प्रवेशासाठी परीक्षेचा फार्स; SCERT च्या परीक्षांमध्ये ५ ते १० गुणांची ग्रेस

या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाता येणार नाही.
school took common exam to admission scert 5 to 10 grace marks education career job nagpur
school took common exam to admission scert 5 to 10 grace marks education career job nagpuresakal
Updated on

Nagpur News :आरटीई कायद्यांतर्गत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून शाळांमध्ये एक सामाईक परीक्षा घेण्यात येणार आहे. जो अनुत्तीर्ण होईल त्याला पुढल्या वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला.

मात्र, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाचवीत तीन गुण आणि आठवीत केवळ सहा गुणांची आवश्‍यकता असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे होणार असल्याने सरकारकडून निव्वळ परीक्षेचा फार्स करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच शाळांमध्ये पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक सत्रांत परीक्षा राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून घेण्याचे ठरविले आहे.

school took common exam to admission scert 5 to 10 grace marks education career job nagpur
Winter Session 2023 : बेरोजगारी आणि शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरोधात युकाँची विधानभवनावर धडक; पटोले, राऊत, गिरी अटकेत

या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाता येणार नाही. त्यामुळे या परीक्षांना राज्यात महत्त्व प्राप्त होणार आहे. यामध्ये पाचवीसाठी ५० तर आठवीसाठी ६० गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून पाचवीमध्ये प्रत्येक विषयात ३५ टक्के म्हणजे १८ गुण तर आठवीमध्ये ३५ टक्के प्रमाणे २१ गुण मिळविल्याशिवाय त्यात उत्तीर्ण होता येणार नाही.

मात्र, दोन्ही वर्गात १० गुण प्रात्यक्षिकाचे देण्यात आले असून एका विषयात अनुत्तीर्ण झाल्यास ५ गुणांची ग्रेस आणि तीन विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला तिन्ही विषय विभागून देण्यात येणार आहे.

school took common exam to admission scert 5 to 10 grace marks education career job nagpur
Nagpur : पुरवणी मागण्यांवर पाटील यांचा आक्षेप,चर्चेनंतरच मागण्या मंजूर कराव्यात

असे असल्याने, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यास कुठलीही अडचण येणार नसल्याचे दिसून येत आहे. असे असल्याने आता या परीक्षा घेण्याचा अट्टहास शिक्षण विभाग का करीत आहे? हे कळायला मार्ग नाही.

पहिली ते चौथीपर्यंत करा उत्तीर्ण

पुढल्या वर्गात जाण्यासाठी पाचवी आणि आठवीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्‍यक करण्यात आले असले तरी, पहिली ते चौथीदरम्यान एकाही मुलाला अनुत्तीर्ण करण्यात येऊ नये असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये परीक्षा

शाळेत पाचवी आणि आठवीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जूनमध्ये परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा वार्षिक परीक्षेतील गुणांप्रमाणे घेण्यात येईल. मात्र, पहिल्या सत्र परीक्षेचे आयोजन शाळेलाच करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.