Nagpur Crime : मित्र निघाला 'बेवफा'! तिने त्याच्यासाठी मैत्रिणीच्या दागिन्‍यांवर हात साफ केला, पण त्याने पोलिसांकडे...

Nagpur crime latest news in marathi |अडचणीत सापडलेल्या मित्राला मदत करण्यासाठी तिने मैत्रिणीच्या घरातील दागिन्‍यांवर हात साफ केला. दुसरीकडे ज्याच्याकरिता ती 'चोरणी' झाली, तो मित्र मात्र 'बेवफा' निघाला.
she cheat her friend jewelry for him
Nagpur crime latest news in marathi Sakal
Updated on

भिवापूर : अडचणीत सापडलेल्या मित्राला मदत करण्यासाठी तिने मैत्रिणीच्या घरातील दागिन्‍यांवर हात साफ केला. दुसरीकडे ज्याच्याकरिता ती 'चोरणी' झाली, तो मित्र मात्र 'बेवफा' निघाला. ती पोलिसांच्या कचाट्यात अडकताच तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तो तिच्या विरोधात जाऊन माफीचा साक्षीदार झाला.

एखाद्या चित्रपटाच्या कथानकात शोभावी अशी विचित्र घटना रविवारी (ता.२१) उघडकीस आली. येथील रामधन चौक परिसरात राहणाऱ्या दिलीप काटोले यांच्या घरच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेले. एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिणे मुलीच्या मैत्रिणीने चोरून नेले असावे, असा संशय काटोले कुटुंबीयांनी व्यक्त केला.

त्या दिशेने तपास करीत पोलिसांनी संशयित मैत्रिणीला ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणारी ती पोलिसी हिसका बघून टाळ्यावर आली व चोरी केल्याचे स्वीकार केले. मात्र चोरी का केली, या प्रश्नांचे तिने दिलेले उत्तर ऐकून पोलिस अवाक झाले.

तिचा 'खास मित्र' असलेला निखिल आर्थिक अडचणीत होता. त्याला मदत करण्यासाठी तिने मैत्रीणिच्या घरचे सोन्याचे दागिने चोरून ते निखिलच्या हवाली केले. त्याने त्यातील काही दागिने गहाण ठेवले व उरलेले स्वतःजवळ लपवून ठेवले. पो

लिसांनी निखिलला ताब्यात घेत त्याच्या मदतीने चोरीला गेलेले दागिने जप्त केले. चोर सापडला व चोरी गेलेला ऐवज सुद्धा सापडला. पण केस ‘सॉलिड’ करण्यासाठी पोलिसांना तिच्याविरुद्ध ठोस साक्षीदार हवा होता. त्याकरिता पोलिसांनी निखिलला जाळ्यात ओढले. पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी कसलाही विचार न करता त्याने पोलिसांची ‘ऑफर’ स्वीकार केली व तिच्याविरोधात साक्ष द्यायला तयार झाला.

ज्याच्याकरिता चोरी केली तोच माफिचा साक्षदार झाल्याने त्या ‘चोरणी’कडे डोक्यावर हात मारून घेण्यावाचून काही उरले नाही. मंगळवारी पोलिसांनी तिला अटक करुन सूचनापत्रावर सोडले. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक महागावे करीत आहेत. मित्राला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या नादात ती स्वतः मात्र चांगलीच अडचणीत सापडली असल्याच्या चर्चा येथे सर्वत्र होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.