शिवसेनेला डावलले : पालकमंत्री राऊत यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

शिवसेनेला डावलले : पालकमंत्री राऊत यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Updated on

नागपूर : जिल्ह्यात समित्या वाटपाचे सूत्र ठरले असतानाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी कामठी तालुक्यात दुय्यम स्थान दिल्याने शिवसैनिक चांगलेच खवळले आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल पाठवून तक्रार केली आहे. (Shivsena-Congress-Nitin-Raut-Complaint-to-Chief-Minister-Uddhav-Thackeray-nad86)

सुमारे दोन वर्षांपासून विविध शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आधीच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यात काँग्रेसतर्फे ठरलेल्या सूत्राचे पालन केले जात नाही, कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याने कामठी विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी उघडपणे नाराजी दर्शविली आहे.

शिवसेनेला डावलले : पालकमंत्री राऊत यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गोंदिया : वाघ आला, वाघ आला, पळापळा! गोरेगाव वनबिटात दहशत

रामटेकमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातील मौदा आणि पारशिवनी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद शिवसेनेला देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मौदा तालुक्याला अध्यक्षपद दिले नाही. विशेष म्हणजे कामठीमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आमदारांचा कोटा येथे लागू होत नाही.

दुसरीकडे काँग्रेसचा आमदार असलेल्या उमरेड विधानसभा मतदारसंघातील भिवापूर, उमरेड, कुही तालुक्याला काँग्रेसने अध्यक्षपद दिले. राज्यात फक्त काँग्रेसची सत्ता नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. असे असतानाही शिवसेनेला डावलले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. पालकमंत्री हटाव मोहीम हाती घेऊ असा इशाराही देवेंद्र गोडबोले यांनी दिला.

शिवसेनेला डावलले : पालकमंत्री राऊत यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
वन्यप्राण्यांच्या हैदोसाने गावे झाली कुलूपबंद! शेकडो जमीन पडीक

काँग्रेसला पक्ष वाढवायचा नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या पक्षातील मतभेद आणि भांडणे मिटवावे. ते मिटत नाही म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवू नये. आमच्या कोट्यातील नावे जाहीर करावीत. आम्हाला गृहीत धरणे काँग्रेसने सोडावे. मुख्यमंत्र्यांकडे एक तक्रार मेलद्वारे केली आहे. लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागपूर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे सुरू असलेली कुरघोडी त्यांच्या कानावर घातली जाईल, असेही गोडबोले यांनी सांगितले.

(Shivsena-Congress-Nitin-Raut-Complaint-to-Chief-Minister-Uddhav-Thackeray-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.