Puran Poli : यंदा पुरणपोळीचे गणित बिघडणार

पोळा आणि पुरणपोळी हे समीकरण परंपरागत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे खांदे शेकून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यामुळे पोळ्याला पुरणपोळीचे विशेष महत्त्व आहे. उत्पादन कमी झाल्याने सरकारच्या गोदामातील हरभरा डाळीचा साठा कमी आहे.
Puran Poli
Puran Polisakal
Updated on

राजेश रामपूरकर

नागपूर : पोळा आणि पुरणपोळी हे समीकरण परंपरागत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे खांदे शेकून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यामुळे पोळ्याला पुरणपोळीचे विशेष महत्त्व आहे. उत्पादन कमी झाल्याने सरकारच्या गोदामातील हरभरा डाळीचा साठा कमी आहे. राज्यांमध्ये कमी उत्पादन, वाढती मागणी आणि इतर घटकांमुळे साखर महागली आहे. सणासुदीत या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार असून यंदा पोळ्याचा विशेष मेन्यू असलेली पुरणपोळी महागली आहे.

देशात मागील वर्षीच्या हंगामात पावसाची दडी आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले होते. किमान आधारभूत किंमत कमी असल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापारी आणि दलालांकडे हरभरा विकला. सरकारला अतिशय कमी प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करता आली.

साठ्यापेक्षा मागणीच अधिक

दोन वर्षांपासून साठवून ठेवलेला हरभरा आणि यावर्षी खरेदी केलेल्या हरभऱ्यापेक्षा मागणी अधिक आहे. सणासुदीच्या काळात चण्याची मागणी दुप्पटीने वाढते. पण मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडलेले आहे. त्यामुळेच पोळ्यासह येणाऱ्या सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात प्रति किलो १५ रुपयाची वाढ झालेली आहे. १५ दिवसांपूर्वी ८५ ते ८७ रुपये किलो असलेली हरभरा डाळ आता १०० ते १०२ रुपये किलो झालेली आहे. येत्या दोन महिन्यात तूर डाळ १५० रुपये किलो जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साखरही झाली कडू

देशात साखरेच्या भावात वाढ होत आहे. पंधरा दिवसांत साखरेच्या दरात प्रतिकिलो एक ते दोन रुपयांची वाढ झालेली आहे. साखर किरकोळ बाजारात ४५ ते ४७ रुपये किलो आहे. आगामी काळात सणासुदीच्या तोंडावर आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन साखर मिळविल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध राहणार आहे. एक ऑक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत असताना देशात ७५ लाख टन साखर शिल्लक असेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे असे किराणा व्यापारी प्रकाश जैस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.