वर्धा : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्याचे कार्य देशपातळीवर असले तरी वर्धा जिल्ह्याशी असलेली नाळ ही वेगळीच आहे. सिंधुताई यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील नवरगाव (Navargaon birthplace in Wardha) येथे १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला. येथूनच लग्नानंतर त्यांचा खडतर प्रवास सुरू झाला. त्यांचे मुख्य कार्य इतरत्र असले तरी माहेर असलेल्या या जिल्ह्यात त्यांनी बरेच कार्य केले.
नवरगाव येथे त्यांनी गोपिका गोरक्षण केंद्र (Gopika Gorakshan Kendra) सुरू केले. यातून त्यांनी गोपालनाचा संदेश दिला. वर्धेतील अनाथ मुलांसाठी त्यांनी अभिमान बालभवन सुरू केले. याशिवाय त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. वर्ध्यातील असलेल्या त्यांच्या नात्यामुळे त्यांच्या जाण्याने वर्धेकर दुःखात आहेत. सिंधुताई (Sindhutai Sapkaal) या वर्ध्यातील असल्याने त्यांनी शेवटचा बराच काळ वर्ध्यात घालवला. पिपरी (मेघे) येथे असलेल्या माई निवासात त्यांनी बराच काळ वास्तव्य होते.
... अन् त्या शाळेत जाऊन बसायच्या
वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. सिंधुताईंचे (Sindhutai Sapkaal) वडील अभिमान साठे गुरं वळायचे काम करीत होते. गाव लहान असल्यामुळे तेथे सुविधा उपलब्ध नव्हत्या. घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.