मोहपा-कळमेश्वर (जि. नागपूर) : भावाने बहिणीचा निर्घृण खून (Sisters murder) केल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गळबर्डी मोहपा येथे घडली. जी बहीण भावाला तिची रक्षा करण्यासाठी दरवर्षी राखी बांधून कर्तव्याची जाण करून देते त्याच भावाने बहिणीला यमसदनी पाठवून बहीण भावाच्या प्रेमळ नात्याला अपवित्र केले. शरद विठोबा गणोरकर (वय ३०, रा. गळबर्डी मोहपा, ता. कळमेश्वर) असे आरोपीचे, तर उज्ज्वला अर्पित भोजने (वय ३२, रा. हुडकेश्वर, नागपूर) असे मृत बहिणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला ही पती अर्पित भोजने व दोन जुळ्या मुलांसह शुक्रवारी आई सरस्वतीबाई विठोबा गणोरकर हिच्याकडे मोहपा येथे आली होती. बहीण उज्ज्वला व भाऊ शरद यांच्यामध्ये पूर्वीपासून शेती व घर या संपत्तीसाठी वाद (Family Dispute) सुरू होता. आधीपासूनच शरद आईला कुठलेही सहकार्य करीत नव्हता. म्हणून उज्ज्वला त्याला नेहमी बोलायची की ‘तू आईला मदत करीत नाही’. अशा अनेक छोट्या-मोठ्या घटनेतून त्यांचे आपसात भांडणे व्हायचे.
आई सरस्वती व भाऊ शरद हे दोघेही एकाच घरात हिस्सेवाटनी करून राहतात. आई व लहान मुलगी घराच्या मागच्या बाजूला तर शरद घराच्या समोरच्या बाजूला राहतो. आज सकाळी आई शरदच्या खोलीसमोरील कुंडीतील माती काढत असताना उज्ज्वलाने पुन्हा त्याला समज दिली. परंतु, शरद ऐकायला तयार नव्हता. यामुळे उज्ज्वलाने त्याला विटेचा तुकडा मारून फेकला. तो चेहऱ्यावर लागल्याने त्याचा राग अनावर झाला.
त्याने पती व मुलांसमोर उज्ज्वलावर जवळ असलेल्या बांबूने डोक्यावर जोरदार प्रहार केला. तसेच विटेने डोक्यावर वार केले. यामुळे उज्ज्वला जखमी झाली. तिला उपचारार्थ सावनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी शरदला कळमेश्वर पोलिसांनी अटक (accused arrested) केली. घटनेचा तपास एपीआय प्रवीण मुंडे, पीएसआय शिवाजी मुंडे, एएसआय लक्ष्मण रुढे, पोलिस हेड कॉंन्सटेबल प्रमोद तभाने, पोलिस शिपाई ललित उईके व राजेश कुंभरे करीत आहेत.
कंडक्टर म्हणून करत होता काम
शरद हा बसवर कंडक्टर म्हणून काम करत होता. २०१६ मध्ये त्याचे लग्न झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी येणे-जाणे दूर पडू लागल्याने तो पत्नीसह सासरी जयताळा येथे राहू लागला़. अंदाजे एक वर्षानंतर शरद हा मोहपा गावात परत येऊन आई सरस्वती यांच्यासोबत पत्नी व मुलांसह राहू लागला़. त्यावेळी तो मोहपा येथून नागपूरला येणे जाणे करायचा. २०१८मध्ये त्याने काही कारणास्तवर नोकरी सोडली व मोहपा गावात मिस्त्री काम करू लागला़.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.