औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात

औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात
Updated on

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत अनेक परिवारांवर संकट कोसळले. अख्खेच्या अख्खे कुटुंबच कोरोनाने विळख्यात घेतल्याची अनेक उदाहरणे समोर आली. शास्‍त्री ले-आउट सुभाषनगर चौक येथील रहिवासी बेदरकर कुटुंबानेही (Bedarkar family) असाच कटू अनुभव घेतला. एकाच कुटुंबातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आले. उपराजधानीत कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच या कुटुंबाने अगदी सहजतेने कोरोनाविरोधातील लढ्यात यश मिळविले. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आवश्यकच आहेत. त्यासोबतीला मानसिक संतुलन, सकारात्मकता, योग्य आहार अधिक गुणकारी ठरत असल्याचे स्वानुभवातून बेदरकर कुटुंबाने दाखवून दिले आहे.(Six members of the Bedarkar family defeated Corona)

व्हायब्रेशन, सुजोक, ॲक्युप्रेशर यासारख्या थेरेपींची प्रॅक्टीस करणारे मकरंद बेदरकर यांनी नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट अगदी पिकवर होती. संसर्ग टाळण्यासाठी हे कुटुंब काढे, दुधासह झिंकबेस्ड औषधेही घेत होते. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात वास्तव्यास असणारे त्यांचे दोन पुतणेही घरी आले होते.

औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

२३ एप्रिलला घरातील काही सदस्यांना थकल्यासारखे वाटले. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत स्वतः मकरंद बेदरकर, भाऊ पंकज, वहिनी वंदना, १३ वर्षीय पुतण्या पवन व मोठ्या भावाची मुले चैतन्य (१७) व चिन्मय (११) यांनाही लक्षणे दिसून आली. डॉक्टरांसोबत संपर्क साधला असता त्यांनी रात्री पॅरासिटामोल घेण्यासह चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. तपासणीसाठी जाऊनही दोन दिवस परतावे लागले. पण, त्याच सुमारास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे व सकस आहार सुरू केला.

कोविडचे दडपण घेतले नाही

प्रसंग बाका होताच. पण, कुणीही कोविडचे मनावर दडपण येऊ दिले नाही. सर्वसामान्य तापाप्रमाणेच घरात सर्वांची वर्तणूक होती. एकमेकांसोबत सकारात्मक बोलणे, आवश्यक खबरदारी घेणे सुरू ठेवले. प्रोटिनयुक्त जेवण व फळांचे सेवन वाढविले. तीच जमेची बाजू ठरली. अगदी अल्पावधीतच आजारातून सावरू लागले. प्रकृतीतील सुधारणा आत्मविश्वास वाढविणारी ठरल्याचे बेदरकर कुटुंबीय सांगतात.

औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात
मातापित्याचे छत्र गेल्याने चारही मुली अनाथ; उईके कुटुंबावर काळाची झडप
कोरोना हा मृत्यूच्या दाढेतील प्रवास असला तरी संयम आणि सकारात्मकता राखल्यास लवकर बरे होता येते. घाबरून न जाता लढण्याची जिद्द कायम ठेवणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांनी लवकर बरे होण्याचा आत्मविश्वास बाळगायला हवा.
- मकरंद बेदरकर

(Six members of the Bedarkar family defeated Corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.