सृष्टीची अनोखी कामगिरी; पाच वेळा कोरले ‘गिनेस बुक’मध्ये नाव

सृष्टी शर्मा
सृष्टी शर्मा सृष्टी शर्मा
Updated on

नागपूर : सोयीसुविधा असलेल्या महानगरांमध्येच खेळाडू घडतात असे नाही. छोट्या शहरांमधूनही अनेक गुणवान खेळाडू पुढे आल्याची असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात. उमरेडची लिंबो स्केटर सृष्टी शर्मा अशीच एक खेळाडू आहे. अवघ्या १७ वर्षांच्या सृष्टीने आतापर्यंत तब्बल पाच वेळा प्रतिष्ठेच्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरून ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असल्याचे दाखवून दिले आहे.

वंडरगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सृष्टीचा प्रवास अतिशय संघर्षमय पण तेवढाच प्रेरणादायी आहे. अवघ्या चार वर्षांची असताना राष्ट्रीय स्केटर असलेल्या आपल्या थोरल्या बहिणीला (सिद्धी) स्केटिंग करताना पाहून ती पहिल्यांदा या खेळाकडे आकर्षित झाली. गुणवत्ता व स्वकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच स्केटिंगमध्ये उत्तुंग झेप घेतली. वास्तविक उमरेडसारख्या छोट्या शहरात खेळाच्या फारशा सोयीसुविधा नाहीत. असे असतानाही विपरीत परिस्थितीवर जिद्दीने मात करत तिने आपल्या गावासह विदर्भाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

सृष्टी शर्मा
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून वीजनिर्मिती; भड यांचे संशोधन

सृष्टीने देशभरातील अनेक रोलर स्केटिंग व आईस स्केटिंग स्पर्धांमध्ये असंख्य पदके जिंकली. मात्र तिची खरी ओळख झाली ती गिनेस बुकमधील विश्वविक्रमी कामगिरीने. जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गिनेस बुकमध्ये तिने एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल पाचवेळा आपले नाव कोरले आहे. सृष्टीने गेल्या आठवड्यातही उमरेडच्या रोडवर आयोजित ओव्हर ५० बार्समध्ये सर्वात वेगवान लिंबो स्केट करून सहाव्यांदा गिनेस बुकवर दावा ठोकला आहे. तिने ७.३८३ सेकंदाचा नवा विश्वविक्रम नोंदवत चीनच्या वू सवेला (७.९७४ सेकंद) मागे टाकले. या विक्रमी कामगिरीनंतर लवकरच सृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मुकुट रोवला जाणार आहे.

सामाजिक बांधिलकीही जपली

सेंटर पॉइंट स्कूलची (वर्धमाननगर शाखा) विद्यार्थिनी असलेल्या सृष्टीने खेळ व शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. स्केटिंगच्या उपक्रमाच्या माध्यमातून ती भारतीयांना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा संदेश देत असते. जन्माला येणारी मुलगी ही परिवारावर ओझे नाही. तिला शिकवून मोठे केले तर, भविष्यात नक्कीच तिचा तुम्हाला अभिमान वाटेल, असे लहानग्या सृष्टीचे म्हणणे आहे.

गरिबी व अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलींना स्केटर बनविले आहे. त्यांच्यासाठी आम्हाला मोठा त्याग करावा लागला. मात्र सिद्धी व सृष्टीने उमरेडचे नाव करून आमच्या मेहनतीचे चीज केले. दोघींच्याही कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
- धर्मेंद्र शर्मा, सृष्टीचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.