जिल्हा रुग्णालय बनलेय बाधकामांचा सांगाडा

कोरोनाचे कारण सांगत रुग्णालयाचे काम अर्धवट ठेवण्यात आले
जिल्हा रुग्णालय बनलेय बाधकामांचा सांगाडा
Updated on

नागपूर : जिल्ह्याच्या मुख्यालयी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचा बांधकामाचा अर्धवट अवस्थेतील सांगाडा तेवढा दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता उद्रेकजन्य स्थितीत हे रुग्णालय तातडीने उभारणे आवश्यक होते. मात्र तीन वर्षांपासून दुर्क्ष होत आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागावर रुग्णांचा भार येईल, या भितीपोटी रुग्णालयाचे काम रेंगाळत असल्याची जोरदार चर्चा पसरली आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा २०१३ मध्ये कॉंग्रेस सरकारने केली होती. मात्र यानंतर राज्यामध्ये सत्ता बदल झाला. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुन्हा एकदा जिल्हा मुख्यालयी जिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा रुग्णालयाचा घोळ संपता संपत नाही. वारंवार घोषणा होत असल्याने १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाला गुपचूप २०१६ मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ८ एकर जागेवर बांधकामाचे भूमिपूजन झाले. ४ एप्रिल २०१६ रोजी बांधकामासाठी आवश्‍यक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत वळता झाल्यानंतर बांधकाम सुरू झाले.

जिल्हा रुग्णालय बनलेय बाधकामांचा सांगाडा
आमदार सावकारांविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

आणखी दोन वर्ष लागतील

२०१८ मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयातील जागेवर थेट कामाला सुरवात करण्यात आली. वर्ष दीड वर्षात जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र अद्यापही रुग्णालयाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. तीन वर्षे बांधकाम पूर्ण होत आहेत. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मेडिकल आणि मेयोतील निवासी डॉक्टर, परिचारिका अल्प मनुष्यबळावर लढा सुरू आहे. जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेचा आरोग्य विभाग आज सक्षम असता, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी समर्थपणे करता आली असती, असे आरोग्य विभागाचेच तज्ज्ञ खासगीत बोलतात.

जिल्हा रुग्णालयातील सोयी

एक्‍स रे, सीटी स्कॅनपासून तर एमआरआय निदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल यामुळे मेयो, मेडिकलवर असलेला रुग्णसेवेचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. गावखेड्यातील शेतकऱ्यांना, गरिबांना सार्वजनिक आरोग्य सेवेचा आधार आहे. आगामी दोन वर्षांत जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरही बघ्याची भूमिका

कोरोनामुळे गरिबांपासून साऱ्यांच्या अर्थकारणाची चाके निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. कोरोनाच्या साऱ्या उपचाराचा भार मेडिकल, मेयोवर अवलंबून आहे. मात्र जिल्हा रुग्णालय नसल्यामुळे आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका स्वीकारत आहे. तर महापालिकेचा आरोग्य विभाग पंगू बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()