Nagpur : स्मार्ट नागपुरातील नरक बघायचा असेल तर चला गोंड वस्तीत

नागपूर स्मार्ट सिटीतील सारे सिमेंट क्रॉंक्रिटचे रस्ते
Nagpur news
Nagpur newsesakal
Updated on

नागपूर : नागपूर ही संत्रानगरी. हिरवेगार शहर. स्वच्छतेचे पुरस्कार महापालिकेने एकदोनवेळा मिळवले आहेत. नागपूर स्मार्ट सिटीतील सारे सिमेंट क्रॉंक्रिटचे रस्ते म्हणजे मोठ्ठा विकास झाला, आभासी नागपूर तयार झाले. आता तर शहरातील सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकला तरी दंड आकारण्याची घोषणा महापालिकेने केली, मात्र ज्या वस्तीत रस्तेच नाहीत. घाण पाण्यासमोरच स्वंयपाकाला बसलेली माय या वस्तीत दिसते. रस्ते नसलेल्या वस्तीत शिरायचं आहे तर नाकाला रुमाल बांधावा लागेल. या वस्तीचे नाव आहे गोंड वस्ती. अर्थात नागपुरातील ‘नरक’ बघायचा असेल तर या गोंड वस्तीत साऱ्यांना निमंत्रण आहे. असाच आभासी दुनियेला चपराक लगावणारा प्रकार येथे दृष्टीस पडतो.

Nagpur news
Nagpur : रस्ते, बांधकामाची कामे रद्द

हनुमानगर झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या शेषनगरजवळ ३० वर्षांपूर्वी वसलेल्या गोंड वस्तीत (सिद्धेश्वरीनगर) २११ झोपड्या आहेत. येथील प्रत्येक झोपडीत खाणारे दहा नव्हेतर त्यापेक्षा अधिक जीव आहेत. दोन हजार लोकसंख्या असलेली गोंड वस्ती विकासापासून दूर आहे. ही वस्ती बेरोजगारांची वस्ती बनली आहे. येथील एकही माणूस सरकारी तर सोडा साध्या खासगी कार्यालयातही नाही. साऱ्यांचे पोट हातावर आहे.त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चऱ्हाट अन कुऱ्हाड घेऊन वृक्षतोडीचे त्यांचे काम थांबले. यामुळे पोटाची आदवड कशी भराची हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. नुकतेच रमेशचा मृत्यू झाला.

Nagpur news
Nagpur : किलोमीटरच्या सक्तीने एसटी तोट्यात

येथील लोकं म्हणतात, उपास तापास सहन करत होता, परंतु सरकारी दरबारात मात्र त्याला राशनपाणी मिळाल्याची नोंद आहे. तरीही लेकरंबारं उपाशी ठेवायची हा सवाल तर त्यांच्या पाचवाली पूजला आहे. या गोंड वस्तीतील एकाही युवकाच्या हाताला काम नाही, हे आजचे वास्तव आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही गोंड वस्ती कुठे आहे, हे देखील माहीत नाही. शासन-प्रशासनाच्या ‘मन की बात’ मध्ये कोणीही या गोंड वस्तीतील बेरोजगारांच्या पोटापाण्याची बात करीत नाही, मात्र त्यांच्या या गोंड वस्तीच्या विकासाची बात महापालिकेने मागील तीस वर्षांत केली नाही. रोज कमवायचे आणि रोज खायचे असे त्यांचे आयुष्य, परंतु रोज त्यांच्या हाताला काम मिळत नाही, यामुळे उपासाचे फाके पडणे त्यांच्या नशिबी आलेच आहे.

Nagpur news
Nagpur : तणावामुळे पोलिसांना होतेय बीपी, शुगर

दोन हजार लोकवस्तीसाठी अपुरे शौचालय

दोन हजार लोकांच्या या गोंडवस्तीसाठी बोटावर मोजण्याइतके शौचालय तयार करून दिले आहेत. मात्र येथे पाण्याची सोय नाही. नागरिक या शौचालयात कसे जातील. यामुळे बाहेरच शौचाला बसण्याशिवाय या वस्तीतील लोकांना पर्याय नाही. उच्चभ्रूंच्या वस्तीमध्ये सायंकाळी वीज बंद पडली सारे प्रशासन धावून जाते, मात्र या गोंड वस्तीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणी पायच ठेवला नसल्याचा आरोप या वस्तीतील तुफान उईके, चंदन उईके यांच्यासह अनेक नागरिकांनी केला आहे.

Nagpur news
Nagpur : आमदारपुत्राचा रेल्वे स्थानकावर गोंधळ

एकही अंतर्गत रस्ता नाही...

या गोंड वस्तीत प्रवेश करायचा आहे तर नाकाला रुमाल लावूनच करावा लागतो. येथे पाण्याची सोय नाही. कोणीतरी दानशूर व्यक्तीने हातपंप लावून दिले. या हातपंपाच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गोंड वस्तीमध्ये अंतर्गत रस्तेच नाहीत. वस्तीच्या बाहेरून एक रस्ता दिसतो. त्या रस्त्यावरील टोकदार दगडावर वाहन गेल्यास हमखास टायर फुटण्याची हमी आहे.

Nagpur news
Nagpur : संत्र्याच्या पिकविम्यासाठी पाचपट रक्कम

त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चऱ्हाट अन कुऱ्हाड घेऊन वृक्षतोडीचे त्यांचे काम थांबले. यामुळे पोटाची आदवड कशी भराची हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. नुकतेच रमेशचा मृत्यू झाला. येथील लोकं म्हणतात, उपास तापास सहन करत होता, परंतु सरकारी दरबारात मात्र त्याला राशनपाणी मिळाल्याची नोंद आहे. तरीही लेकरंबारं उपाशी ठेवायची हा सवाल तर त्यांच्या पाचवाली पूजला आहे. या गोंड वस्तीतील एकाही युवकाच्या हाताला काम नाही, हे आजचे वास्तव आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही गोंड वस्ती कुठे आहे, हे देखील माहीत नाही. शासन-प्रशासनाच्या ‘मन की बात’ मध्ये कोणीही या गोंड वस्तीतील बेरोजगारांच्या पोटापाण्याची बात करीत नाही, मात्र त्यांच्या या गोंड वस्तीच्या विकासाची बात महापालिकेने मागील तीस वर्षांत केली नाही. रोज कमवायचे आणि रोज खायचे असे त्यांचे आयुष्य, परंतु रोज त्यांच्या हाताला काम मिळत नाही, यामुळे उपासाचे फाके पडणे त्यांच्या नशिबी आलेच आहे.

Nagpur news
Nagpur : एका पदासाठी ५६ उमेदवार

दोन हजार लोकवस्तीसाठी अपुरे शौचालय

दोन हजार लोकांच्या या गोंडवस्तीसाठी बोटावर मोजण्याइतके शौचालय तयार करून दिले आहेत. मात्र येथे पाण्याची सोय नाही. नागरिक या शौचालयात कसे जातील. यामुळे बाहेरच शौचाला बसण्याशिवाय या वस्तीतील लोकांना पर्याय नाही. उच्चभ्रूंच्या वस्तीमध्ये सायंकाळी वीज बंद पडली सारे प्रशासन धावून जाते, मात्र या गोंड वस्तीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणी पायच ठेवला नसल्याचा आरोप या वस्तीतील तुफान उईके, चंदन उईके यांच्यासह अनेक नागरिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()