Nagpur Crime News : फेसबुक फ्रेंडसोबत पत्नी पळाली; पतीची उच्च न्यायालयात धाव

सोशल मीडियाचे दुष्परिणाम घराघरांत दिसत आहेत. काही परिणाम हे आरोग्यावर तर काही नात्यांवर दिसतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका प्रकरणातून सोशल मीडियाच्या प्रभावातून घडलेली एक कौटुंबिक घटना पुढे आली आहे.
Social media affect wife with facebook friend nagpur
Social media affect wife with facebook friend nagpurSakal
Updated on

नागपूर : सोशल मीडियाचे दुष्परिणाम घराघरांत दिसत आहेत. काही परिणाम हे आरोग्यावर तर काही नात्यांवर दिसतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका प्रकरणातून सोशल मीडियाच्या प्रभावातून घडलेली एक कौटुंबिक घटना पुढे आली आहे.

पत्नी फेसबुक फ्रेंडसोबत पळून गेल्याने हतबल झालेल्या पतीवर चक्क न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली. त्यांना दोन मुले देखील आहे, हे विशेष. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.

८ फेब्रुवारी २०२४ रोजी पीडित पतीला आपली पत्नीला बेपत्ता असल्याचे लक्षात आले. संपूर्ण दिवसभर सगळीकडे शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ९ फेब्रुवारी रोजी त्याने चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यामध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी लगेच तपासचक्रे फिरविली. या दरम्यान ती जिगर सोबत बडनेरा (जि. अमरावती) येथे पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. जिगर सोबत तिची ओळख फेसबुकवर झाली. त्याला बडनेरा येथे शासकीय नोकरी आहे.

पोलिसांनी तिचे बयाण नोंदवीत याची माहिती पतीला दिली. पत्नी दोन महिन्यांपासून घरी परतली नसल्याने पतीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. फेसबुक फ्रेंड जिगरने पत्नीला दिशाभूल करीत पळवून नेले असून त्यामुळेच पोलिसांना तिने स्वत:च्या मर्जीने घर सोडल्याची थाप मारली आहे.

जिगर तिची दिशाभूल करीत असल्याने दोन मुलांना मागे ठेवत तिने हे पाऊल उचलले. ती जीगरच्या दबावात असल्याचा संशय पतीने व्यक्त केला आहे. म्हणूनच पत्नीचा ताबा मिळावा (हेबियस कॉर्पस), अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.

न्यायालयाने पत्नीला न्यायालया समक्ष हजर करण्याचे आदेश मागील सुनावणीत बडनेरा पोलिसांना दिले होते. पत्नीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रजनीश व्यास यांच्या मार्गदर्शनात ॲड. कीर्ती देशपांडे यांनी बाजू मांडली. तर, राज्य शासनातर्फे ॲड. तृप्ती उदेशी यांनी बाजू मांडली.

पत्नी म्हणे, मी घटस्फोट घेणार

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बडनेरा पोलिसांनी पत्नीला हजर केले. जीगरने माझी दिशाभूल केली नसून मी माझ्या मर्जीने बडनेरा येथे आल्याची माहिती जयाने न्यायालयाला दिली. तसेच, मी बडनेरा येथे जीगरसोबत राहत नसल्याचे नमूद केले. शिवाय, पतीला मी घटस्फोट देणार असल्याचेही सांगितले. पत्नी सज्ञान असल्याने तिला निर्णय घेण्याची मुभा असल्याचे मत व्यक्त करीत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.