सावधान! ‘त्वरित लोन पाहिजे, ॲप्स डाऊनलोड करा’ असा मेसेज आला? थांबा आधी ही बातमी वाचा

As soon as you download the app, your bank account will be empty
As soon as you download the app, your bank account will be empty
Updated on

नागपूर : ‘त्वरित लोन पाहिजे... ॲप्स डाऊनलोड करा’ असा मॅसेज किंवा फोन करून अनेक गरजूंना सायबर क्रिमिनल्स जाळ्यात ओढत आहेत. मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करताच बॅंक खात्यातून परस्पर रक्कम काढून गंडा घालण्यात येत आहेत. त्यामुळे कोणतेही ॲप्स डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगा. अन्यथा सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून गंडविल्या जाल...

लॉकडाऊन आणि कोविडमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींनी लहानसहान धंदा टाकून उदरनिर्वाह सुरू केला आहे. सध्या कोरोनाची लस आल्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त करून जीवनाचा गाडा व्यवस्थित हाकण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे कुठूनतरी कर्ज मिळवून व्यवसाय थाटण्यासाठी किंवा बेरोजगारी दूर करून कामधंदा सुरू करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत. याचाच फायदा सायबर क्रिमिनल्स घेत आहेत.

अनेक मोबाईलवर ‘त्वरित कर्ज उपलब्ध... मोबाईल ॲप्स डाऊनलोड करा’ असे मॅसेज येत आहेत. तर काहींनी सायबर क्रिमिनल्सच्या टोळ्या फोन करून विना डाक्युमेंट कर्ज उपलब्ध असल्याचे सांगत आहेत. त्यांचा हा नवीन फंडा अनेकांवर भारी पडत आहे. कर्ज मिळविण्यासाठी उत्सुक असलेले अनेक जण मोबाईलवर ॲप् डाऊनलोड करतात.

ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर सुरू करण्यासाठी माहिती भरत आहेत. बॅंकेची माहिती मिळताच सायबर क्रिमिनल्स त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे उडवित आहेत. अशा बऱ्याच तक्रारी नागपूर सायबर क्राईममध्ये दाखल आहेत. त्यावरून पोलिस हायटेक गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

कुणी बळी पडल्यास घाबरू नका
मोबाईलमध्ये ॲप्स डाऊनलोड करण्याचा सल्ला देऊन कर्ज देण्याचा फंडा सायबर क्रिमिनल्स वापरत आहेत. या ॲप्सद्वारे आपल्या बॅंक खात्याची माहिती गुन्हेगार चोरतात. त्यानंतर आपल्या खात्यातून परस्पर पैसे काढतात. कुणीही कर्ज मिळविण्यासाठी अशा आमिषांना बळी पडू नका. कुणी बळी पडल्यास घाबरू नका. थेट सायबर क्राईममध्ये तक्रार करा. अशा तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. 
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.