नागपूर : विविध पक्षी, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे यांच्यासाठी शहर प्रसिद्ध होते. पण कालाच्या ओघात या जैवविविधतेला (biodiversity) ग्रहण लागले. शहरातील नैसर्गिक अधिवासच नष्ट होत असल्याने चिमणी (sparrows), कावळा (crows), बुलबुल, पोपटासह सुतार या व अन्य पक्षांनी शहराला रामराम ठोकला. शहरातील अनेक भाग चिवचिवाटाला पारखे झालेले आहेत. असेही दिवस अनुभवले आहेत की चिमणी,कावळा,पोपट,भोर आदी पक्षी अंगणात बागडायचे. पण आता येणाऱ्या पिढ्यांना या पक्षांची ओळख करून देण्यासाठी शहराबाहेर जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (sparrows and crows not seen in nagpur)
चिमण्या मानवी वस्तीजवळ राहतात. चिमण्यांची घरटी घरातील माळ्यावर, अगदी विजेच्या ट्यूबच्या पट्टीवरही आढळतात. चिमण्या रात्री झाडांवर बसत असल्या, तरी घरटी मात्र झाडावर करत नाहीत. अलीकडील काळात म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांत चिमण्यांना घरटी बनवण्याची सुविधा आपण संपवल्याने त्यांचे स्थलांतर होत आहे.
नागपूर हे हिरव्या झाडीत लपलेले शहर दिसत असले तरी कावळे, बुलबुल, मैना, चिमण्यांची संख्या कमी होत आहे, असे पक्षीमित्रांचे निरीक्षण आहे. पूर्वी शहरातील नागनदी, सिव्हिल लाइन्स, मध्यवर्ती कारागृह, महाराजबागचा परिसरातील झाडांवर चिमण्यांचे थवे मोठया प्रमाणात दिसायचे. कारण या भागात विशाल झाडे होती. तसेच शहरातील अनेक भागातील जुनी घरे पडून तेथे गुळगुळीत सिमेंटचे प्लास्टर असलेल्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे पक्ष्यांना घरटी करण्यासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे चिमण्या, कावळे, मैना, बुलबुल आता शहराबाहेर, परंतु कमी विकसित अशा भागाकडे स्थलांतरित झाल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.