Railway: रेल्वेतील गर्दीवर नियंत्रणासाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’! मदतीसाठी बूथ स्थापना, सामान्य डब्यात विशेष पथक तैनात करणार

Nagpur News: यासह तिकीट प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करणे तसेच अधिक गर्दीच्या ठिकाणांसाठी जादा भाडे तिकीट (ईएफटी) प्रणाली सद्यःस्थितीत बंद करण्यात आली आहे.
Railway
RailwayEsakal
Updated on

गर्दीमुळे आरक्षित तिकीट असूनही जागा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यावर नियंत्रणासाठी मध्य रेल्वेने मदतीकरिता बूथची स्थापना केली आहे. तसेच सामान्य डब्यात विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. आरक्षित तिकीट धारकांसाठी योग्य बोर्डिंग सुविधा, शयनयान आणि सामान्य डब्यांमध्ये विशेष टीम तैनात करण्यात आल्या आहेत. टीमकडून प्रवासी गाडीत आरामात चढू शकतील याची दखल घेण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य गैरसोयी कमी होण्यात मदत होईल. गरजू प्रवाशांना मदत देण्याचे महत्त्व ओळखून ‘मे आय हेल्प यू’ बूथची स्थापना करण्यात आली आहे.

Railway
Pench Tiger Reserve : पेंच व्‍याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाचा आलेख उंचावला, वाघोबाच्या दर्शनासाठी वाढतेय गर्दी

यासह तिकीट प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करणे तसेच अधिक गर्दीच्या ठिकाणांसाठी जादा भाडे तिकीट (ईएफटी) प्रणाली सद्यःस्थितीत बंद करण्यात आली आहे. याशिवाय गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सेवा देण्यासाठी स्वयं-सहायता गट आणि नागरी संस्थेची मदत घेतली आहे.

Railway
Illegal Sand Mining: वाळू तस्करांना पोलिसांचा दणका! उमरेडला एक तर तळोधीती तीन टिप्परवर कारवाई

या उपक्रमात उन्हाळ्यात गाडीच्या जनरल आणि शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्या गरजू प्रवाशांसाठी सर्वच स्थानकावर मोफत पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. ही सुविधा बैतूल, आमला, नागपूर, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव आणि चंद्रपूर या स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. अन्य स्थानकावरही ही सुविधा लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.