Nagpur Audi Car Accident : नागपुरात ऑडी कारने तीन वाहनांना उडवलं; चालक मद्यधुंद असल्याचा संशय, बड्या भाजप नेत्याशी कनेक्शन?

Nagpur Audi Car Accident Latest News : पोलिसांनी याप्रकरणी कार चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांच्या विरोधात बेदारकपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Accident
Nagpur Accident Esakal
Updated on

नागपूर : नागपुरात काल मध्यरात्री एका भरधाव ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झाले असून कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास काचीपुरा चौक ते रामदासपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.