Sport News : नागपूरच्या सिया देवधरची आशियाई स्पर्धेसाठी निवड

दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत भारताची सलामी लढत २५ सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानविरुद्ध होणार आहे.
asian games
asian games sakal
Updated on

नागपूर - नागपूरची आंतरराष्ट्रीय खेळाडू सिया देवधर हिची येत्या २३ सप्टेंबरपासून हांगझोऊ (चीन) येथे सुरू होत असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय बास्केटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. २० वर्षीय सिया ३ इन ३ या बास्केटबॉल क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. या प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणारी ती नागपूरची एकमेव बास्केटबॉलपटू आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत भारताची सलामी लढत २५ सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानविरुद्ध होणार आहे. सिया ही गेल्या सहा वर्षांपासून शिवाजीनगर जिमखानाचे प्रशिक्षक छत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले आणि विनय चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

सियाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तिला एनबीए अकादमीच्या (भारत) तिन्ही शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे. शिवाय टोकियो येथे झालेल्या बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर आशियाई शिबिरासाठीदेखील तिची निवड करण्यात आली होती.

asian games
Ganesh Festival 2023 : 'चप्पल घालून कोण पूजा करतं का फराह'? कोरिओग्राफरनं दिले सणसणीत उत्तर

चौथी नागपूरकर महिला खेळाडू

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली सिया ही नागपूरची चौथी महिला, तर एकूण पाचवी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी प्रियांका खेडकर, अमृता पांडे, बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे व धावपटू राजीव बालकृष्णन या नागपूरकर खेळाडूंनी आशियाई स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

चीनमध्ये नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड, क्रिकेटपटू जितेश शर्मा आणि आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे हे वैदर्भीय खेळाडूदेखील सहभागी होणार आहेत.

asian games
Nag Panchami 2023 : वर्षातून एकदाच उघडतं हे मंदिर, माता पार्वती अन् महादेव शेषनागावर आहेत विराजमान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.