डिझेल दरवाढीचा एसटीच्या मालवाहतुकीवरही परिणाम, आता लागू झाले नवीन भाडे

st good carrier rate increases due to hike in diesel rate in nagpur
st good carrier rate increases due to hike in diesel rate in nagpur
Updated on

नागपूर : डिझेल दरवाढ होत असल्याने एसटी महामंडळात पुन्हा एकदा मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी असलेले किमान १०० किलोमीटरपर्यंतचे ४२ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे आता ४६ रुपये केले. राज्यात आठ मार्चपासून एसटीच्या मालवाहतुकीचे नवीन भाडे लागू झाले आहे. 

महामंडळाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून डिझेल पुरवठा केला जातो. मात्र, एक मार्चला डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे खर्चातील वाढीचा विचार करून आठ मार्चपासून एसटीच्या मालवाहतुकीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी १०० किलोमीटरपर्यंत किमान प्रतिकिलोमीटर भाडे ४२ रुपये होते; मात्र त्यामध्ये चार रुपयांची वाढ करून आता ४६ रुपये केले आहे, तर एकेरी भाड्याचे ३५०० रुपये दर आकारले जाणार आहे. १०१-२५० किलोमीटरसाठी ४० ऐवजी आता ४४ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारले जाणार आहेत, तर २५१ किलोमीटरच्या पुढे ३८ रुपयांऐवजी ४२ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारले जाणार आहेत. 

दोन्ही मार्गांवरील भाड्याचे दर - 
यापूर्वी दोन्ही मार्गांवर जाणे-येण्याचे बुकिंग असल्यास १०० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोमीटर तर येताना ३८ रुपये दर घेतले जात होते. १०१ ते २५० किलोमीटरसाठी जाताना ३८ रुपये आणि येताना ३८ रुपये, तर २५१ किलोमीटरपेक्षा जास्त जाताना ३६ रुपये आणि येताना ३४ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारले जात होते; मात्र आता १०० किलोमीटरपर्यंत जाताना किमान ४६ रुपये, येताना ४४ रुपये किलोमीटर दर आकारले जाणार आहेत, तर १०१ ते २५० किलोमीटरदरम्यान जाताना ४४ रुपये आणि येताना ४२ रुपये, तर २५१ किलोमीटरच्या पुढे जाताना ४२ रुपये, तर येताना ४० रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारले जाणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.