केळवद (जि. नागपूर) : मागील पाच दिवसांपासून मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील पर्यटक तसेच प्रवाशांची कोरोना तपासणी सक्तीची केल्यामुळे याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे.
महाराष्ट्रात विशेषतः नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागपूर जिल्ह्यातील प्रवासी मध्यप्रदेश राज्यात येऊ नये, यायचे असल्यास कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत आणवा ,असा आदेश मध्यप्रदेश सरकारचा असल्यामुळे महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसला मध्यप्रदेश सिमेवर थांबऊन तेथूनच प्रवासी आणि एसटी बसला परत महाराष्ट्रात पाठविण्याचा प्रकार नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामर्गावरील केळवद-सातनूर सीमेवर पाहवयास मिळत आहे.
यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे रोजचे एक लाखाचे नुकसान होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांनी जायचे कसे, असा बिकट प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण झालेला आहे.
मध्यप्रदेश येथून येणाऱ्या मध्यप्रदेशातील खासगी प्रवाशी वाहतुकीला मात्र महाराष्ट्रात कसल्याही प्रकारची बंदी नसल्याने मध्यप्रदेशातील खासगी प्रवाशी वाहतुक बिनधास्तपणे महाराष्ट्रातून ये-जा करीत आहे. यामुळे कोरोना रुग्णांची निर्मिती महाराष्ट्रातूनच होते काय, असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.
मध्यप्रदेश सीमेवरील केळवद-सातनूर सिमेवर प्रवाशी सोडून परत पाठवित असलेल्या राज्य परिवहन बसेसच्या चालक, वाहक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बसचे चालक, वाहक, तसेच प्रवांशानी कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट सोबत आणावा, तरच मध्यप्रदेशात प्रवेश दिला जाईल असा मध्यप्रदेश सरकारचा आदेश असल्याने आम्हाला येथून खाली बस घेऊन परत जावे लागत असल्याचे सांगीतले. मध्यप्रदेश राज्य सरकारच्या अजब निर्णयामुळे प्रवांशाची गैरसोय होत असल्याने यातून तातडीने मार्ग काढावा, अशी
राज्य परिवहन महामडंळाचे मोठे नुकसान
मध्यप्रदेश राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यपरिवहन महामंडळाचे विशेषतः सावनेर आगाराच्या पाच फेऱ्या नागपूर, उमरेड तसेच भडांरा या आगाराच्या बऱ्याच फेऱ्या मध्यप्रदेशातील पचमढी, छिंदवाडा, सौंसर, रामाकोना, लोधीखेडा, बेरडी या शहरात दैनंदिन जात असल्याने राज्य परिवहन विभागाला रोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. राज्य परिवहन बसेसला निर्जतुंकीकरण आणि चालक वाहक, प्रवांशाना मॉस्क घालून प्रवास करणे बंधनकारक असताना अश्या स्थितीत राज्य परिवह महामंडळाच्या बसेसला मध्यप्रदेश राज्यात प्रवेश न देणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
आर.डी.रामटेके
आगारप्रमुख सावनेर
एकीकडे नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करीत मध्यप्रदेश राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशी आणि राज्य परिवहन महामडंळाच्या बसेसवर बंदी घातली आहे. मग मध्यप्रदेशातून येणारे आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात मध्यप्रदेशातील खासगी वाहनातून बिनधास्तपणे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना कोरोना नाही, हे मध्यप्रदेश सरकार कसे ठरवणार याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधून मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी प्रवाशी वाहतुकीवर बंदी घालावी.
सतीश लेकुरवाळे,
अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमेटी
सावनेर
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.