भावी लष्करी अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेऱ्या वाढणार

file photo
file photo
Updated on

नागपूर : संघ लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता.६) नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमीची परीक्षा घेण्यात येणार आहे. भावी लष्करी अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी लालपरीही सज्ज झाली आहे. परतीच्या प्रवासासाठी १२० ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोनोना संकटातच राज्यभरातून उमेदवार येणार असल्याने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी गणेशपेठ व मोरभवन स्थानकावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी नागपूर व मुंबई असे दोनच ठिकाणी परीक्षा केंद्रं आहेत. परीक्षेसाठी राज्याभरातून ३२ हजार उमेदवार येणार आहेत. त्यातील १० टक्क्याहून अधिक म्हणजेच साडेतीन हजाराहून अधिक उमेदवार एसटीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. यामुळे शनिवार व रविवारी बसस्थानकावर मोठी गर्दी लोटण्याची शक्याता आहे.

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. म्हणूनच गणेशपेठ व मोरभवन स्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विदर्भातील बसेसची व्यवस्था गणेशपेठ व उर्वरित महाराष्ट्रातील बसेसची व्यवस्था मोरभवन येथून करण्यात आली आहे. 

कोरोना संकटामुळे प्रत्येकबसमध्ये २२ प्रवाशीच बसू शकतात. यामुळे मोठ्यासंख्येने बसेस सोडाव्या लागत आहेत. बाहेरून येणाऱ्या बसेस परतीसाठी उपलब्ध राहणार असल्या तरी कोणतीही गरज भासल्यात ज्यादा बसेस सोडता याव्यात यादृष्टीने १२० ज्यादा बसेसचे नियोजन नागपूर विभागाने केले आहे. 

विभाग नियंत्रकांसह ४० पर्यवेक्षकांची पूर्णवेळ तैनाती

परिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासाठी स्वतः एसटीचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्यासह सुमारे ४० पर्यवेक्षक दोन दिवस पूर्णवेळ तैनात असतील. याशिवाय गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून आवश्यक उपाययोजने संदर्भात मागणी करण्यात आली आहे. 


‘शटल बस’ सेवा

परीक्षेनंतर उमेदवार चुकीच्या बसस्थानकावर पोहोचल्याच त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवून देण्यासाठी ‘शटल बस’ सेवा केवळ १०रुपयांत उपलब्ध राहिल. 

लुबाडणूक टाळण्यासाठी उपाययोजना

कोरोनाच्या संकटकाळात खासगी बस कंपन्यांकडून उमेदवारांची लूबाडणूक होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी एसटीने प्रभावी उपाययोजना केली आहे. नियमित भाड्यातच एसटीची सेवा उपलब्ध असणार आहे.

परीक्षार्थ्यांच्या सुवीधेसाठी  सज्ज
परीक्षार्थ्यांच्या सुवीधेसाठी एसटी सज्ज आहे. सोशल डिस्टंसींग व सॅनेटायजेशनच्या उपाययोनेसह उमेदवारांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आवष्यक नियोजन करण्यात आली असू प्रवाशांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने काळजी घेतली जात आहे.
नीलेश बेलसरे
विभाग नियंत्रक, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.