SRPF: एसआरपीएफ कमांडंटच्या सुरक्षा रक्षकाच्या घरी चोरी, ९ एमएम पिस्तुलसह ३० राऊंडची चोरी

राज्य राखीव पोलीस दल गट क्रं. ४ नागपूर येथील कमांडंटच्या सुरक्षा रक्षकाच्या क्वार्टरमधून घरफोडी करून चोरट्यांनी ९ एमएम ग्लॉक पिस्तुलसह ३० राऊंडची चोरी केल्याची घटना उघडकीस आली.
SRPF: एसआरपीएफ कमांडंटच्या सुरक्षा रक्षकाच्या घरी चोरी, ९ एमएम पिस्तुलसह ३० राऊंडची चोरी
Updated on

Hingna SRPF: राज्य राखीव पोलीस दल गट क्रं. ४ नागपूर येथील कमांडंटच्या सुरक्षा रक्षकाच्या क्वार्टरमधून घरफोडी करून चोरट्यांनी ९ एमएम ग्लॉक पिस्तुलसह ३० राऊंडची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे ‘एसआरपीएफ’ मध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणा मार्गावर एसआरपीएफचा कॅम्प आहे. या ठिकाणी कमांडंट म्हणून प्रियंका नारनवरे कार्यरत आहेत. त्यांचा सुरक्षारक्षक व गनमॅन म्हणून नाईक पोलीस शिपाई मंगेश केशव लांजेवार एसआरपीएफ कॅम्पमधील नवीन शासकीय निवासस्थान क्रं. ९३/४ येथे वास्तव्याला आहेत. २४ डिसेंबर रात्री ९ ते २५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत कर्तव्यावर होते‌.

यानंतर एक दिवसाचा रेस्ट असल्याने ते कुटुंबियासह भंडारा जिल्ह्यातील बेला येथे गावाकडे गेले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली ९ एमएम ग्लॉक पिस्तुलसह ३० राऊंड घरीच कपाटात ठेवले. २६ डिसेंबरला सकाळी ६.३० वाजता तो गावावरून परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. घरातील कपाटातून पिस्तूल आणि ३० राऊंड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अनुराग जैन, सहायक पोलीस आयुक्त तेजाळे, एमआयडीसीचे ठाणेदार भिमा नरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चांदेवार यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून श्वान पथकालाही पाचारण केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साबळे करीत आहे.

SRPF: एसआरपीएफ कमांडंटच्या सुरक्षा रक्षकाच्या घरी चोरी, ९ एमएम पिस्तुलसह ३० राऊंडची चोरी
ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.