E-Bus Nagpur : खासगी चालकांच्या हातात ई-बसचे ‘स्टेअरिंग’

आठवडाभरात येणार चार बस; खासगीकरणाकडे वाटचालीचा कर्मचाऱ्यांना संशय
steering of 4 e-bus in hands of private drivers privatisation nagpur
steering of 4 e-bus in hands of private drivers privatisation nagpurSakal
Updated on

- अखिलेश गणवीर

नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या नागपूर विभागात ई-बसची प्रतीक्षा आता संपणार आहे. २६ बसगाड्यांना मंजुरी मिळाली असून तीन-चार दिवसांत काही बस नागपुरात दाखल होत आहेत. मात्र, या बस एसटीचे नव्हे तर ओलेक्ट्रा कंपनीतील चालकांच्या हाती या ई-बसचे ‘स्टेअरिंग’ राहणार आहे. त्यामुळे एसटीची ही खासगीकरणाकडे वाटचाल तर नाही ना? असा संशय कर्मचारी वर्तुळात व्यक्त होत आहे.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटीत प्रचंड प्रवासी वाढलेत. गाड्या हाऊसफूल होऊन धावतात. मात्र, त्या तुलनेत गाड्यांची संख्या अपुरी आहे. बहुतांश गाड्या जुन्या झालेल्या असून त्यांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे मार्गावर ‘ब्रेक डाऊन’मुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नवीन गाड्यांची मागणी जुनीच आहे. मात्र, ‘लालपरी’ व्यतिरिक्त पर्यावरणपूरक ई-बसेस’ येत आहेत. प्रवाशांना आरामदायक आणि वातानुकूलित सेवा मिळण्याचा हेतू यामागे आहे.

steering of 4 e-bus in hands of private drivers privatisation nagpur
Nagpur Weather Update : नागपूरसह संपूर्ण विदर्भात वरुणराजाचा धुमाकूळ: विदर्भात चार दिवस यलो अलर्ट

इमामवाडासह सहा आगारात ई-चार्जिंग स्टेशन

महामंडळाच्या नागपूर विभागातील सहा आगारामध्ये ई-चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यापैकी इमामवाडा आगारातील स्टेशनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गणेशपेठ, उमरेड, रामटेक, सावनेर, काटोल या आगारांत ई-चार्जिंग स्टेशनचे काम प्रस्तावित आहे. १२ मीटरची ई-बस एकदा चार्ज केल्यानंतर ३०० किमी धावणार आहे. तर ९ मीटरची बस २०० किमी धावेल.

११० ई-बसची अपेक्षा

नागपूर विभागातील आठ आगारात सध्या ४२४ बसेस धावत आहे. नवीन २६ ई-बसेसला मंजुरी मिळाल्यानंतर ही संख्या ४५० होणार आहे. तीन-चार दिवसात पहिल्या टप्प्यात तीन ते चार ई-बस सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्ट महिन्यात पूर्ण २६ बसेस मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नागपूर विभागात सध्या ११० ई-बसची मागणी असून लवकरच त्या मिळतील अशी अपेक्षा महामंडळाच्या नागपूर विभागाला आहे.

steering of 4 e-bus in hands of private drivers privatisation nagpur
Nagpur Hit And Run Case : जबलपूर-हैदराबाद हायवेवर ‘हिट अँड रन’; ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चालक खासगीचे, वाहक महामंडळाचे

ओलेक्ट्रा कंपनीच्या असलेल्या ई-बसवर कंपनीकडून चालक नियुक्त केले जाणार आहेत. मात्र, या बसवर वाहक हे एसटी महामंडळाचे असणार आहे. ई-बसची संपूर्ण देखभाल आणि दुरुस्ती ही ओलेक्ट्रा या खासगी कंपनीकडे असणार आहे.

२६ ई-बसला मंजुरी मिळाली असून ऑगस्ट महिन्यात त्या पूर्ण मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तीन ते चार बस आठवडाभरात दाखल होणार आहे. याबसची देखभाल व दुरुस्ती ओलेक्ट्रा कंपनीकडून होईल. चालक त्यांचे राहणार असून वाहक मात्र महामंडळाची राहतील.

- श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती प्रादेशिक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.