Mohan Bhagwat : मीपणा सोडा अन् निवडणुकीच्या आवेशातून बाहेर या.. RSS प्रमुखांचा भाजपला घरचा आहेर ?

मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षांपासून हिंसाचाराची आग धगधगत आहे. अशा प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला हवे,’ असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राज्यकर्त्यांना दिला.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatsakal
Updated on

नागपूर - ‘निवडणूक काळामध्ये समाजामध्ये दोन गट तयार होतील असे आरोप राजकारण्यांकडून विनाकारण झाले. हे आरोप करताना तंत्रज्ञानाचा वापर असत्य पसरविण्यासाठी करण्यात आला. या वादामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील ओढण्यात आले. निवडणुका झाल्या शासन आले. आता या चर्चा बंद करा.

मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षांपासून हिंसाचाराची आग धगधगत आहे. अशा प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला हवे,’ असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राज्यकर्त्यांना दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग - द्वितीय’च्या समारोपीय सोहळ्यात शिक्षार्थींना उद्देशून ते बोलत होते.

भागवत म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत चांगली कामे झाली आहेत याचे समाधान आहे. परंतु आपण आव्हानातून मुक्त झालो असे नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आवेशातून आता आपण बाहेर यायला हवे. देशामध्ये लोकशाही आहे. या अंतर्गत संसदेमध्ये दोन पक्ष काम करतात. लोकशाही प्रणालीत निवडणुकांसारख्या घटना होतच राहतील.

या घटना लोकशाहीच्या नियमानुसारच होत असतात. त्यामुळे लोकांच्या मताचा आदर करायला हवा. त्यामध्ये इतक्या चर्चा करण्यासारखे महत्त्वाचे काही नाही. निवडणूक लढविताना एक मर्यादा असते त्याचे पालन केले तरच आपण लोकसेवक म्हणवून घेऊ शकू तरच देशही प्रगती करू शकेल.’

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील श्री क्षेत्र गोदावरी धाम, बेट सरलाचे पीठाधीश महंत रामगिरी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी इक्बाल सिंह, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. या वर्गाचा प्रारंभ १७ मे रोजी झाला होता. संपूर्ण देशभरातल्या विभिन्न प्रांतातून ९३६ शिक्षार्थी या वर्गात सहभागी झाले होते.

समाजाला स्वीकारत पापक्षालन करा

‘समाजात वावरताना आपणच योग्य असा भाव असायला नको. इतिहासामध्ये जे झाले त्याच्या जखमा मोठ्या आहेत. त्या भरायच्या झाल्यास त्याला विसरणे गरजेचे आहे. मते वेगळी असून शकतात, कार्यपद्धती वेगळी असू शकतात. बंधुभाव कायम ठेवत आपल्याला या समाजामध्ये राहावे लागणार आहे,’ असे भागवत म्हणाले.

‘शेजारचा माणूस चांगला आहे, हे मनाला पटत असले तरी आपण त्याला स्वीकारण्याची हिंमत करीत नाही. हजारो वर्षांपासून आपण जे पाप केले त्याच्या प्रक्षालनासाठी हे करायलाच हवे. सामाजिक समरसतेसाठी प्रत्येक समाजातील व्यक्ती आपली मित्र असायला हवी,’ असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींना जर स्वतःहून वाटत नसेल किंवा मणिपूरच्या जनतेच्या मागणीकडे जर ते दुर्लक्ष करत असतील तर कदाचित सरसंघचालकांच्या सांगण्यावरून तरी ते मणिपूरला जातील. वाजपेयींनी २२ वर्षांपूर्वी मोदींना काय सांगितले होते ते आठवा - ‘तुम्ही तुमच्या राजधर्माचे पालन करा.’

- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.