SSC Exam: दहावीच्या परीक्षेचा तणाव आलाय? या क्रमांकावर साधा संपर्क, बोर्डाने केली समुपदेशन केंद्राची निर्मिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून (ता.१) दहावीचा परीक्षेला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातून ६७६ केंद्रावर १ लाख ५५ हजार २८ विद्यार्थी परीक्षा देतील.
SSC Exam
SSC Examsakal
Updated on

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून (ता.१) दहावीचा परीक्षेला सुरुवात झालीआहे. नागपूर विभागातून ६७६ केंद्रावर १ लाख ५५ हजार २८ विद्यार्थी परीक्षा देतील. सकाळी साडेदहा त अडीच दरम्यान पहिला पेपर प्रथम भाषा मराठीचा आहे.

विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईन्ट असलेल्या दहावीच्या परीक्षा अतिशय महत्वाच्या आहेत. त्यासाठी मौखिक परीक्षा या १० ते २९ तारखेदरम्यान घेण्यात आल्यात. आता १ मार्च ते २६ मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी शाळांसोबतच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील खोल्या या परीक्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागपूर विभागाच्या वतीने परीक्षेसाठी चोख बंदोबस्त केला जात आहे. प्रश्नपत्रिकांसाठी विभागात ८४ ‘कस्टडी’ तयार करण्यात आल्या आहेत. तर ६७६ परीक्षा केंद्रावर १ लाख ५४ हजार ७२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ६० हजार ८०० विद्यार्थी हे नागपूर शहर आणि ग्रामीण येथून तर सर्वात कमी १४ हजार ६०६ विद्यार्थी गडचिरोलीतून परीक्षा देतील.

प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके

परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, राज्य शिक्षण व प्रशिक्षण, योजना आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकांचा समावेश राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसूल विभागाचे भरारी पथकही परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन राहणार आहेत. याशिवाय भ्रमणध्वनी व अन्य तांत्रिक उपकरणांना परीक्षा केंद्रावर बंदी आहे.

SSC Exam
10th,12th Board Exam : प्रात्यक्षिक परीक्षांवरही करडी नजर ; दहावी, बारावीतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना

समुपदेशनासाठी विभागनिहाय क्रमांक

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. त्यामुळे यादरम्यान विद्यार्थ्याला नैराश्‍य येण्याची शक्यता असते. त्यासाठी बोर्डाच्या वतीने विभागनिहाय समुपदेशन केंद्राची निर्मिती केली असून त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही दिले आहे. त्यातील समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल. नागपुरात ९८२२६९२१०३, ८८३०४५८१०९, ९६७३१६३५२१, ८३०८००७६१३ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

जिल्हानिहाय विद्यार्थी केंद्र

नागपूर शहर ३२,०६७ ९५

नागपूर ग्रामीण २८,५९१ १२५

चंद्रपूर २८,२४८ १२४

भंडारा १६,५२३ ८७

वर्धा १६,३९८ ७३

गोंदिया १८,६२३ ९८

गडचिरोली १४,६०६ ७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.