नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर बोगस पदवीच्या माध्यमातून विद्यार्थिनीने विदेशात नोकरी मिळविली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठात तपासणीसाठी आलेल्या तिच्या गुणपत्रिका आणि पदवीवर विविध सरकारी विभागांचे अधिकृत सील (शिक्के)असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.