कोरोनामुळे पालक गमावणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ, तर काहींना मोफत शिक्षण

corona
coronae sakal
Updated on

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) मृत्यूमुखी पडलेल्या पालकांच्या पाल्यांना काही शाळांनी शिक्षण शुल्क माफ करून १० वीपर्यंतचे शिक्षण मोफत (free education to student) देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच काही शाळांनी विद्यार्थ्यांना १० ते २५ टक्क्यांपर्यंत शुल्क माफ केले असून शिक्षण विभागाकडे त्यासंदर्भातील लेखी स्वरूपात माहिती सादर केली. (student who lost their parents in corona will get free education in nagpur)

corona
नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा भरल्या नाही. संपूर्ण सत्र ऑनलाइन झाले. त्यामुळे अनेक पालकांनी शाळा शुल्क न घेण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. काही शाळा जादा शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारीही शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी खासगी सीबीएसई शाळांशी संबंधित आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित शाळांच्या तपासणीचे निर्देश दिले होते. परंतु, या शाळांनी तपासणीसाठी सहकार्य केले नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पत्र देत तक्रारींच्या पडताळणीला विरोध दर्शविला होता. त्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे पुन्हा तक्रार निवारण समितीची बैठक सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूलमध्ये घेण्यात आली. तक्रारी असणाऱ्या शाळांचे संचालक व मुख्याध्यापकांना हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जादा शुल्क वसुलीबाबत करण्याची तक्रार असलेल्या ४० शाळांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासोबत १० वीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा ठराव काही शाळांनी घेतला. तशी लेखी माहिती शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. सोबतच काही शाळांनी २५, १५ व १० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती बैठकीत असल्याचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()