Summer Heat Wave : उपराजधानीत उष्णतेची लाट! दोन युवकांचा मृत्यू उष्माघाताने

उपराजधानीत उष्णतेची लाट आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.
heatstroke
HeatstrokeSakal
Updated on

नागपूर - उपराजधानीत उष्णतेची लाट आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दर दिवसाला मेडिकल, मेयोमध्ये उकाड्याने त्रस्त चाळीसपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. तर बेघरांचा उकाड्यामुळे मृत्यू होत आहे.

सोमवारी (ता.२७) कमाल चौकातील शनिचरा बाजारात ३५ वर्षीय तर सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडी पुलाजवळ ४५ वर्षीय युवकांचे मृतदेह आढळले. आतापर्यंत उष्माघाताच्या संशयित ९ जणांचे मृत्यू झाले आहेत. मात्र त्यांच्यावर उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शिक्कामोर्तब केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मेडिकल, मेयो, डागा रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत दर दिवसाला सुमारे अडीचशेवर रुग्ण येत आहे.

उष्माघाताची कारणे

  • द्रवपदार्थांची कमतरता

  • तहान लागल्यावरही पाणी न पिणे

  • पुरेसे पाणी न पिणे

  • जास्त वेळ गरम ठिकाणी वास्तव्य केल्याने चक्कर येणे व डोकेदुखी

बाह्यरुग्ण विभागात कोण घेणार नोंद

मेडिकल आणि मेयोसह शासकीय रुग्णालयांना उष्माघाताच्या प्रत्येक रुग्णाची नोंद बाह्यरुग्ण विभागात घेणे बंधनकारक आहे. परंतु मेडिकल, मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात ही नोंद कोण घेणार, हा प्रश्‍न आहे. दाखल रुग्णांव्यतिरिक्त उन्हाचा इतिहास घेत नसल्याची माहिती पुढे आली. यामुळेच बाह्यरुग्ण विभागातील उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होत आहे की नाही याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे समस्या

मेडिकलमध्ये दररोज २०० हून अधिक रुग्ण अतिताप, उलट्या, जुलाब आदी आजारांचे येत आहेत. यापैकी १० टक्के म्हणजे २० रुग्णांमध्ये टायफॉइडची लक्षणे दिसतात. त्यांना उष्माघाताचा त्रास होतो. बहुतेक रुग्णांमध्ये समान लक्षणे असतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या प्रभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे लहान मुले आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना उष्माघाताचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.