Nagpur Temperature : उकाड्याने नागपूरकर हैराण! चार दिवस यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभाग दररोज मॉन्सूनपूर्व पावसाचा यलो अलर्ट देते. आकाशात ढगही दाटून येतात. मात्र पाऊस पडत नाही.
Summer
Summeresakal
Updated on

नागपूर - एक दिवस झलक दाखवून पाऊस गायब झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे चिडचिड व अस्वस्थता वाढली आहे. उन्हामुळे तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे.

प्रादेशिक हवामान विभाग दररोज मॉन्सूनपूर्व पावसाचा यलो अलर्ट देते. आकाशात ढगही दाटून येतात. मात्र पाऊस पडत नाही. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आजही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र थेंबही सांडला नाही. उलट ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढून दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहिल्या. उकाडा वाढल्याने पंखे व कुलर पुन्हा ‘फुल्ल स्पीड’मध्ये फिरू लागले आहेत.

बुधवारी ढगाळ वातावरण असूनही कमाल तापमानात एक ते तीन अंशांची वाढ झाली. कालच्या तुलनेत आज तापमानात १.३ अंशांची किंचित वाढ होऊन पारा ४०.५ अंशावर गेला. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४३.२ अंश सेल्सिअस इतकी झाली.

विदर्भात हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे मान्सूनही महाराष्ट्र व विदर्भात लवकरच दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.