काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार हे सतत आपल्या आक्रमक विधानांमुळे चर्चेत असतात. आता केदार यांचे आणखी एक विधान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते नागपूर जिल्हा पेटवण्याची भाषा करत असल्याचे ऐकू येत आहे. सुनील केदार यांना त्यांच्या या विधानानंतर विरोधक लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूर जिल्ह्यातील सातगाव येथे पुरुष सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी सरपंच योगेश सातपुते यांनी महिला उपसरपंचाला जातीवाचक शिव्या देत धमकी दिली होती. त्यानंतर हे प्रकरण वाढले होते.
दरम्यान हा वाद वाढल्यानंतर महिला उपसरपंचाच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलीस ठाण्यात सातगावचे सरपंच योगेश सातपुते यांच्यावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सुनील केदार यांनी नुकतेच सातगाव परिसरात सभा होती. त्यावेळी केदारांनी सरपंच योगेश सातपुते यांचा नाव घेत तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू असे विधान केले. त्यानंतर आता नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांच्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
नागपुरात जन्मलेले सुनील केदार हे 2004 पासून सावनेर मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडणून येत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही केले आहे. त्यांचे वडील छत्रपाल केदार हे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचे प्रणेते होते.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले होते. दरम्यान बर्वे यांना तिकीट मिळवून देण्यापासून त्यांच्या प्रचारापर्यंत सर्व जबाबदारी केदार यांनी घेत त्यांना विजयी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.