नागपूर : मोबाईल टॉवरमधून (Mobile Tower) निघणारे रेडिएशन मानवी आरोग्यासाठी (Human health tips) धोकादायक आहे. परंतु अजूनही हा प्रश्न सुटला नाही. आज सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी शहरात किती मोबाईल रेडिएशन निघत आहे, याबाबत दूरसंचार विभागाकडून (Telecom Department) सर्वेक्षण करा, असे निर्देश आज प्रशासनाला दिले. (survey of radiations from towers in Nagpur)
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेत प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक राजकुमार साहू यांनी शहरातील मोबाईल टॉवरवर प्रश्न उपस्थित केला. यावरून सभागृहात इतर सदस्यांनीही वाढत्या मोबाईल टॉवरवर चिंता व्यक्त केली. चर्चेनंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील एकूण मोबाईल टॉवरमधून किती रेडिएशन निघतात, याबाबत दूरसंचार विभागाकडून सर्वेक्षण करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
एवढेच नव्हे शहरात किती मोबाईल टॉवर आहेत. शहरात किती टॉवरला परवानगी द्यायला हवी, याबाबतचा अहवालही या विभागाकडून तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मोबाईल टॉवरमधून निघणारे रेडिएशन जास्त असेल तर महापालिकेने न्यायालयात जाण्याची तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी जमाल मोहम्मद यांनी दिव्यांगांना रस्त्याच्या बाजूला स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर महापौरांनी गठई कामगारांप्रमाण दिव्यांगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील किती खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी दिली व त्यातील ८० टक्के बेड अर्थात एकूण किती होते? याबाबत प्रश्न उपस्थित केला. या हॉस्पिटलचा अहवाल पुढील सभेत ठेवण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणेवर विचारलेल्या प्रश्नावर महापौरांनी आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग व नगर रचना विभागाने संयुक्तपणे चौकशी करण्याचे निर्देश दिले.
‘साई`च्या जागेवरील नागरिकांचे होणार पुनर्वसन
‘साई‘ या क्रीडा संकुलाच्या जागेवर जवळपास तीनशे घरे आहेत. मुळात येथे प्लॉट खरेदी केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या नागरिकांनी जागेच्या सर्व कागदपत्रासह गठित केलेल्या समितीपुढे हजर राहून मत मांडावे. या सर्वांचे पाच एकर जागेत पुनर्वसन करण्यात येणार असून प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
(survey of radiations from towers in Nagpur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.