Tadoba-Andhari National Park : ताडोबात २७ नवीन फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद

फुलपाखरांच्या १३४ प्रजाती ; प्रथमच चार नवीन प्रजाती आढळल्या
Tadoba-Andhari National Park 27 new butterfly species recorded nagpur
Tadoba-Andhari National Park 27 new butterfly species recorded nagpursakal
Updated on

नागपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासह आता फुलपाखरांसाठी देखील ओळखले जाणार आहे. दहा वर्षांच्या अभ्यासावर आधारित नुकत्याच तयार केलेल्या अहवालात या प्रकल्पात सहा कुळातील फुलपाखरांच्या १३४ प्रजाती आढळल्या आहेत.

त्यात नवीन २७ प्रजातीचा समावेश झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात २००८-२०१० दरम्यान पहिले सर्वेक्षण सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले यांनी केले होते.

त्यात फुलपाखरांच्या १११ प्रजातींची नोंद झाली होती. २०१० -२०२१ दरम्यान विद्याभारती महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले आणि विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत यांनी संशोधन केले.

त्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफइन्सेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड सिस्टेमॅटिक्समध्ये प्रकाशित झाला आहे. भागवत म्हणाले, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या नोंदीत २७ नवीन प्रजातींची भर घातली असून आता फुलपाखरांच्या एकूण १३४ प्रजाती झाल्या आहेत.

अभ्यासात आढळेल्या एकूण ६० प्रजाती सहज आढळणाऱ्या होत्या. ३४ प्रजाती सामान्य होत्या, नऊ वारंवार आढळणाऱ्या, १९ दुर्मीळ आणि १२ अत्यंत दुर्मीळ होत्या. या नोंदविलेल्या सुमारे १२ प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये संरक्षित आहेत.

निम्फॅलिडे कुळातील ४३ प्रजाती या अभ्यासात आढळल्या. त्यापैकी चार प्रजातींची ताडोब्यात पहिल्यांदाच नोंद झाली आहेत. लिसीनिडी कुळातील ४१ पैकी १२ प्रजाती नवीन आहेत. पायरिडी कुळातील १९ पैकी तीन प्रजाती पहिल्यांदाच नोंदविल्या गेल्या आहेत.

हिस्परिडी कुळातील २० प्रजातींपैकी सहा प्रजाती पहिल्यांदा नोंदविल्या आहेत. पॅपिलिओनिडी कुळातील १० पैकी दोन प्रजाती नवीन आढळल्या आहेत. एक प्रजाती रिओडीनिडी कुळातील आहे.

टिपले यांनी सांगितले की, ‘सहसा ओळखल्या जात नसलेल्या प्रजातींचा अभ्यास करण्याची गरज आहे. फुलपाखरे परागीकरणासाठी महत्त्वाची असतात, कारण ती मकरंद टिपण्यासाठी वेगवेगळ्या फुलांना भेट देतात. त्यामुळे फुलपाखरू हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे.

उपाययोजना

पावसाळ्यापासून हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फुलपाखरे जास्त प्रमाणात आढळली. परंतु, त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस (मार्च) त्यात घट झाली. खाद्य वनस्पतींची अनुपलब्धता आणि पाण्याची कमतरता हे या घसरणीचे कारण असू शकते.

निरोगी आणि उत्तम अनुवांशिक वैविध्य असणाऱ्या या फुलपाखरांच्या प्रजाती टिकून राहण्यासाठी विदेशी खाद्य वनस्पतींऐवजी विविध प्रथिने आणि क्षारांचे स्त्रोत असणाऱ्या देशी वनस्पतींची लागवड करणे देखील या अभ्यासात सुचवले आहे.

अशी केली नोंद

हे सर्वेक्षण तलाव, नद्या आणि आसपासच्या भागांजवळ केले गेले. बहुतेक वेळा फुलपाखरांची ओळख जागेवरच लगेच केली जात असे. यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि आसपासच्या क्षेत्रात वेळ मिळेल तसे निरीक्षण आणि दर पंधरा दिवसांनी छायाचित्रण केले गेले.

फुलपाखरे किती वेळा दिसली त्यानुसार त्यांच्या प्रजातींचे वर्गीकरण करण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले आहे की बागा, वृक्षारोपण केलेली ठिकाणे आणि कुरणे या सारख्या ज्या ठिकाणी माणसाचा वावर आहे. अशा ठिकाणी फुलपाखरे फार कमी आढळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()