'तौक्ते' चक्रीवादळाचा विदर्भाला धोका नाही; पुढील आठवड्यात उन्हाचे चटके

'तौक्ते' चक्रीवादळाचा विदर्भाला धोका नाही; पुढील आठवड्यात उन्हाचे चटके
Updated on

नागपूर : अरबी समुद्रात उसळलेल्या 'तौक्ते' (Tauktae Cyclone Live Update) चक्रीवादळाचा विदर्भाला (Vidarbha) कसलाही धोका नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी पुढील तीन-चार दिवस विदर्भावर अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. (Tauktae Cyclone will not be harmful for Vidarbha)

'तौक्ते' चक्रीवादळाचा विदर्भाला धोका नाही; पुढील आठवड्यात उन्हाचे चटके
कुलरमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे डॉक्टरांचं मत

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगाने मार्गक्रमण करीत असलेले चक्रीवादळ समुद्र किनाऱ्यावरील कोकण, गुजरात व दीव-दमण भागांतून उत्तरेकडे सरकून कमजोर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादळाचा विदर्भावर कसलाही प्रभाव जाणवणार नाही. तथापि 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे तीन-चार दिवस पाऊस व ढगाळ वातावरण अवश्य राहणार आहे.

या काळात काही जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने धुळमिश्रित वादळ व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः सोमवारी व मंगळवारी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून उन्हाचे तीव्र चटके जाणवणार आहेत.

'तौक्ते' चक्रीवादळाचा विदर्भाला धोका नाही; पुढील आठवड्यात उन्हाचे चटके
मिहानमधील भारत बायोटेकला पुण्याला पळविले; आता काँग्रेसचे नेते गप्प का?: आमदार खोपडे

संध्याकाळी पावसाची हजेरी

आज संध्याकाळी नागपूरसह काही भागात पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं अनेकांची तारांबळ उडाली. पुढील दोन दिवसही असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(Tauktae Cyclone will not be harmful for Vidarbha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.