Teacher Day: शिक्षकाने केला झेड. पी. शाळेचा कायापालट!, प्रदीप पडवल यांच्या सकारात्मक कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक

इतकेच नव्हे तर त्यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाप्रसंगी विद्युत रोषणाईदेखील केली होती.
Teacher Day
Teacher DaySakal
Updated on

नागपूर - एखाद्या शिक्षकाने मनावर घेतले तर, तो शाळेत किती ‘पॉझिटिव्ह’ बदल घडवून आणू शकतो, याचे आदर्श उदाहरण खुर्सापार (ता. सावनेर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणता येईल. केवळ दोन महिन्यांपूर्वी आलेल्या मुख्याध्यापकाने अल्पावधीतच शाळेचे रंगरूप पालटून विद्यार्थ्यांना ‘हेल्दी’ वातावरण उपलब्ध करून दिले. प्रामाणिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट केल्याबद्दल या शिक्षकाची गावात वाहवा होत आहे.

Teacher Day
Mumbai News : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

आजच्या घडीला ग्रामीण भागांतील बहुतांश झेड. पी. शाळांची अवस्था वाईट आहे. कित्येक शाळा तर शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा परिस्थितीत एखादी शाळा चांगल्या गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरत असेल तर ते निश्चितच कौतुकास पात्र आहे.

६७ वर्षे जुन्या दोन हजार लोकसंख्येच्या खुर्सापार येथील झेड. पी. शाळेला आदर्श बनविणारे हे मुख्याध्यापक आहेत प्रदीप पडवल. १७ वर्षे रत्नागिरी येथे इमानेइतबारे नोकरी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच (३० जूनला) ते बदली होऊन खुर्सापार येथे आले होते.

Teacher Day
Pune News : आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर तालुक्यातील 68 बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा - दिलीप वळसे पाटील

एक ते चार वर्ग, ३० विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांसह दोन शिक्षक असलेल्या या शाळेची दुरवस्था पाहून ते अतिशय व्यथित झाले. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुधारायची, असा त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला.

सुरवातीला त्यांनी स्वतःच्या खिशातून २० हजार रुपये खर्च करून विविध साहित्य आणून शाळेची रंगरंगोटी केली. कामे अनेक करायची असल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. गावकऱ्यांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या विधायक कार्यात आपापल्या परीने मदत केली.

३८ वर्षीय पडवल यांनी नंतर विकासाचा धडाकाच सुरू केला. समाजसुधारकांच्या फोटोंसह शैक्षणिक बॅनर, वृक्षारोपण, डिजिटलायझेशन व धूळखात पडलेले प्रोजेक्टर्स सुरू केले. शिवाय आरटीओ संजय पेंढारकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले संगणक मुलांसाठी लावला. एकूणच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्वच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.

Teacher Day
Mumbai News : सावित्रीबाई फुले नाट्यगृह व्‍यवस्‍थापकाची उचलबांगडी,तिथेही टिकाव नाही...

इतकेच नव्हे तर त्यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाप्रसंगी विद्युत रोषणाईदेखील केली होती. उल्लेखनीय म्हणजे, हे सर्व बदल त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत केले. या कामात गावकऱ्यांसह खुर्सापार ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश वानखेडे यांनीही मदत केल्याचे पडवल यांनी सांगितले. एका खंगलेल्या झेड. पी. शाळेला नवे रूप देऊन विद्यार्थ्यांसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम गावकरी त्यांची मनापासून प्रशंसा करीत आहेत.

क्रीडांगण व सीसीटीव्हीही लावणार

प्रदीप पडवल एवढ्यावरच थांबणार नाहीत. भविष्यात शाळेत दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, यासाठी त्यांना क्रीडांगण तयार करायचे आहे. शिवाय मुला-मुलींसाठी चांगले स्वच्छतागृह, लॉन, सीसीटीव्ही बसविण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. एकूणच या शाळेला परिसरातील सर्वात सुंदर शाळा बनविण्यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.