नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीला अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आसलेल्या शिक्षक आमदार (Teacher MLA election) जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी दिलेला शब्द पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पदवीधरचे उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केले होते. काँग्रेस (Congress) विचारांच्या सर्व संघटनांची मनधरणी केली होती. मतविभाजन टाळण्यासाठी अनेक उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास सांगतिले होते. ते करताना शिक्षक आमदार संघाच्या निवडणुकीत काही नेत्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना काँग्रेसचा मोठा कस लागणार आहे.
भाजप (BJP) समर्थिक शिक्षक आमदार नागोराव गाणार यांचा कार्यकाळ संपत आला आहे. डिसेंंबर महिन्याच्या अखेरीस ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. पदवीधरमध्ये आमदार कपिल पाटील समर्थित शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार किशोर वर्भे यांना माघार घ्यायला लावण्यात आली होती. शिक्षक मतदारसंघात आम्ही मदत करू असे आश्वासन त्यावेळी दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (congress) समर्थित शिक्षक संघाचे खेमराज कोंडे यांनी निवडणूक लढण्याचा इरादा आधीच जाहीर केला आहे. माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सुधाकर अडबले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आणखीच पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसची चांगलीच गोची होणार
आता शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हेसुद्धा लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यांचे काँग्रेस नेत्यांसोबत घनिष्ट संबंध आहेत. काँग्रेसने यापूर्वी त्यांना नितीन गडकरी विरुद्ध उमेदवारी दिली होती. त्यामुळे दोघांपैकी एकाची निवड करताना काँग्रेसची चांगलीच गोची होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.