Nagpur News : मेडिकलच्या बीएस्सी नर्सिंगमधील प्रकरणात २० विद्यार्थ्यांनी नोंदवली साक्ष

या घटनेमुळे घाबरून ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थिनी वसतिगृह सोडून घरी गेल्या. त्यांची रजा मंजूर केली, परंतु चौकशी समितीने बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता.१०) चौकशीसाठी बोलविले.
testimony recorded by 20 students in case of BSc Nursing of Medical nagpur
testimony recorded by 20 students in case of BSc Nursing of Medical nagpur Sakal
Updated on

नागपूर : मेडिकलशी संलग्न बीएस्सी नर्सिंग कॉलेजमधील ऋतुजा बागडे (१९) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या घटनेमुळे घाबरून ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थिनी वसतिगृह सोडून घरी गेल्या. त्यांची रजा मंजूर केली, परंतु चौकशी समितीने बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता.१०) चौकशीसाठी बोलविले.

मृत ऋतुजाच्या आईवडिलांसह सुमारे २० जणांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. भंडारा येथील रहिवासी ऋतुजा मेडिकलमधील बीएस्सी नर्सिंगला होती. येथील वसतिगृहात ४ एप्रिल रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले.

यामुळे वसतिगृहासह महाविद्यालयात शोककळा पसरली होती, परंतु सोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे मुंबई, पुणे, अकोला, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ पासून तर राज्याच्या विविध भागातील आहेत.

२१ एप्रिल पर्यंत बीएस्सी नर्सिंग प्रशासनाने सुट्या दिल्या आहेत. मात्र मेडिकलचे पीएसएम विभागप्रमुख डॉ. सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय चौकशी समितीने विद्यार्थ्यांना १० एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलविले. त्यानुसार दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या चौकशीचा फेरा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. मृत ऋतुजाचा वावर असलेले विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

उद्या उर्वरित विद्यार्थ्यांची चौकशी

बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना चौकशी समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पीएसएस विभागात चौकशीसाठी बोलविले आहे. सर्व विद्यार्थी सध्या मानसिक तणावात असताना त्यांना अल्पावधीत साक्ष नोंदवण्यासाठी बोलाविणे हा तुघलकीपणा असल्याची चर्चा होती, मात्र चौकशीच्या पहिल्या दिवशी २० जणांची साक्ष नोंदविण्यात आली. उर्वरित विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता बोलविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.