Dr. Rajshree Jain : ६६ वर्षीय महिलेने जिंकली पाच सुवर्णपदके

नागपूरच्या ६६ वर्षीय जलतरणपटू डॉ. राजश्री जैन यांनी सिकंदराबाद (तेलंगणा) येथे प्रौढांच्या फेडरेशन चषक जलतरण स्पर्धेत पाच सुवर्णपदके पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
Dr. Rajshree Jain
Dr. Rajshree Jainsakal
Updated on

नागपूर : नागपूरच्या ६६ वर्षीय जलतरणपटू डॉ. राजश्री जैन यांनी सिकंदराबाद (तेलंगणा) येथे प्रौढांच्या फेडरेशन चषक जलतरण स्पर्धेत पाच सुवर्णपदके पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

पॅन इंडिया मास्टर्स गेम्स फाउंडेशनतर्फे गच्ची बोवली आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित या स्पर्धेत ६५ वर्षांवरील वयोगटात सहभागी झालेल्या डॉ. जैन यांनी ही पदके ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये आणि १०० मीटर व २०० मीटर बटरफ्लाय प्रकारांमध्ये जिंकली.

त्यांनी गतवर्षी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. वयाच्या ३६ व्या वर्षांपासून स्विमिंग करणाऱ्या डॉ. जैन यांनी आतापर्यंत देशविदेशातील विविध स्पर्धांमध्ये १२६ सुवर्ण, ६७ रौप्य व २२ ब्रॉंझसह एकूण दोनशेवर पदकांची कमाई केली आहे.

डॉ. जैन या सदर येथील रेल्वे ऑफिसर्स क्लबमधील तलावावर सराव करतात. या कामगिरीबद्दल जिल्हा प्रौढ जलतरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. जैन यांनी यशाचे श्रेय कुटुंबीयांसह प्रशिक्षक प्रभाकर साठे, जयप्रकाश दुबळे, भोजराज मेश्राम, संजय बाटवे यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com